टरबूजचे अधिक सेवन ठरू शकते आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या अतिसेवन केल्याने होणारे नुकसान

टरबूजचे अधिक सेवन ठरू शकते आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या अतिसेवन केल्याने होणारे नुकसान

फळ खाण्याचा सल्ला तर आपल्याला बरेच जण देतात. फळ खाणे हे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तमच आहे. उन्हाळ्याच्या या दिवसांत तर बाजारात बरीच फळे येतात. आणि या दिवसात तर टरबूज सहज आणि मोठया प्रमाणात उपलब्ध असते.

उन्हाळ्यात हे फळ खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. टरबूजमध्ये भरपूर पाणी असते आणि यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. परंतु उन्हाळ्यात आवडीने खाल्ले जाणारे हे फळ जर जास्त प्रमाणात खाल्ले तर ते शरीरालाही नुकसान देखील होते. चला तर मंग आज या लेखामध्ये अधिक प्रमाणात टरबूज सेवन केल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल माहिती घेऊ…

ऍ-लर्जी होण्याची शक्यता असते – टरबूजचे बरेच फायदे आहेत, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात एलर्जीची प्रतिक्रिया होण्याची शक्यता असते. जर टरबूज आपल्याला अनुकूल नसेल तर आपल्या चेहर्‍यावर सौम्य ते डार्क पुरळ किंवा सूज येऊ शकते.

पोटाच्या समस्या – टरबूजमध्ये लाइकोपीन नावाचे कंपाऊंड आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. परंतु जर शरीरात लाइकोपीनचे प्रमाण वाढले तर ते पोटाच्या समस्येस ते जन्म देतात. जास्त प्रमाणात टरबूज खाल्ल्याने आपल्याला मळमळ, उलट्या, अपचन आणि अतिसार सारख्या समस्या उद्भवू शकतात.

हायपरकलेमिया – सामान्य शरीरात पोटॅशियमचे उच्च प्रमाणाला हायपरकलेमिया असे म्हणतात. टरबूजचे अत्यधिक सेवन केल्याने हायपरकलेमियाची शक्यता वाढते आणि त्यात वाढ झाल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून टरबूज जास्त प्रमाणात खाऊ नये.

या लोकांनी टरबूज खाऊ नये…

दमा किंवा ऍ-लर्जी असणाऱ्या रुग्णांनी टरबूज खाऊ नये. कारण टरबूजाचा प्रभाव हा थंड असतो आणि त्याचे सेवनाने श्वसननळीत सूज येऊ शकते.

टरबूज खाताना या गोष्टी लक्षात घ्या

टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. आपण हे केल्यास आपल्याला उलट्या होऊ शकतात.

रात्रीच्या वेळी टरबूज खाऊ नये. भात खाल्ल्यानंतर किंवा दही खाल्ल्यानंतर टरबूज लगेच खाऊ नये.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral