अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने केला मोठा खुलासा, काय म्हणाली जाणून घ्या

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने केला मोठा खुलासा, काय म्हणाली जाणून घ्या

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. “होणार सुन मी या घरची”, “अगं बाई सासूबाई” या तिच्या मालिका खूप चर्चेत राहिलेल्या आहेत. “होणार सुन मी या घरची” या मालिकेचे मध्ये जान्हवी ची भूमिका ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर केल करून आहे. जान्हवी ही अतिशय साधी आणि उच्च विचारांची मुलगी असते.

या मालिकेच्या सेटवर तिचे आणि शशांक केतकर याचे प्रेम संबंध जुळले होते. त्यानंतर त्यांनी लग्न देखील केले होते. मात्र, काही महिन्याच्या आतच या दोघांनाही घटस्फोट घ्यावा लागला होता. त्यानंतर शशांक केतकर याने प्रियांका ढवळे सोबत लग्न केले. मात्र, आता तेजश्री प्रधान ही सिंगलच आहे. तेजश्री प्रधान हिने “अगबाई सुनबाई” मध्ये देखील काम केले होते.

शुभ्राची हीची मालिकेत समजदार आणि संयमी अशीच भूमिका होती. या दोन्ही मालिकेत तेजश्री हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात उच्च स्थान निर्माण केले आहे. “अगबाई सुनबाई” या मालिकेत मात्र तिने स्पष्ट नकार दिला होता. तिला खात्री होती की ही मालिका फार काळ प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेणार नाही, म्हणून तिने या मालिकेस नकार दिला होता. त्याचप्रमाणे या मालिकेने लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

अग बाई सासुबाई या मालिकेतील सोहम उर्फ बबड्या खूप छान भूमिका निभावली. या मालिकेदरम्यान सोहम आणि शुभ्रा मध्ये खूप छान मैत्री निर्माण झाली. सोहमचे खरे नाव आशुतोष पत्की असे आहे. आशुतोष आणि तेजश्री बद्दल बरीच काही चर्चा रंगत होती. त्याच दरम्यान तेजश्रीची एक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत तेजश्रीला अनेक प्रश्न विचारण्यात आले.

त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे तुझ्या आणि आशुतोषच्या नात्याची सध्या चर्चा आहे? यावर तुझे मत काय ? असा प्रश्न विचारला असता, तेजश्री म्हणाली, जसे प्रत्येकाला आपापल्या कार्यक्षेत्रात मित्र-मैत्रिणी असतात, तसेच आशुतोषची आणि माझी मैत्री आहे. आशुतोष माझा एक चांगला मित्र आहे. मी या आधी त्याच्यासोबत काम केलेले आहे. तो सहकलाकार आहे.

त्या पलीकडे काहीही असेल तर ती वैयक्तिक गोष्ट आहे आणि तसं काही असेल तर मी योग्य वेळ आली की नक्कीच बोलेल. काही उलटसुलट चर्चा मी मनावर घेत नसते, असे तिने स्पष्ट सांगितले होते.

Team Hou De Viral