अभिनेत्री तेजश्री प्रधानने दिली ‘गुडन्यूज’ !

अभिनेत्री तेजश्री प्रधानने दिली ‘गुडन्यूज’ !

‘होणार सुन मी या घरची’ आणि ‘अग बाई सासुबाई’ या मालिकांमध्ये आदर्श असलेली तेजश्री प्रधान सध्या चर्चेत आली आहे. कारण की लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले.

22 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व चित्रपट नाट्य गृह सुरू होणार आहे. हे 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. यासाठी कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच दोन लस ज्यांनी घेतल्या त्यांना चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून चित्रपट गृह बंद आहेत.

त्यामुळे चित्रपट गृह मालकांचे मोठे नुकसान होत झाले. चित्रपट गृह आणि नाट्य गृह वर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांचे रोजगार यामुळे बुडत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चित्रपट तयार होत नसल्याने चित्रपट निर्माते आणि अभिनेता व अभिनेत्री यांचे हे नुकसान होत आहे.

22 ऑक्टोबर पासून चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा हे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तेजश्री हिने सर्वात आधी झेंडा या चित्रपटात काम केले. तिने या चित्रपटामध्ये अगदी छोटी भूमिका केली होती. हा चित्रपट देखील खुप गजला होता. त्यानंतर तिने आणखीन मराठी चित्रपटात काम केले.

मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती होणार सून मी या घरची या मालिकेत. या मालिकेमध्ये तिने जान्हवी हे पात्र साकारले होते. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता शशांक केतकर दिसला होता. शशांकने या मालिकेमध्ये श्रीची भूमिका साकारली होती. मालिकेत ज्याप्रमाणे दोघे पती-पत्नी दाखवले गेले.

त्याच प्रमाणे खऱ्या आयुष्यामध्ये देखील त्यांनी लग्न केले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यातच हे दोघेही विभक्त झाले. आता शशांक केतकर याने प्रियंका ढवळेच्या सोबत लग्न केले आहे. मात्र, तेजश्री प्रधान सध्या सिंगलच आहे. तेजश्री प्रधानने गेल्यावर्षी शर्मन जोशी सोबत बबलू बॅचलर या चित्रपटाचे चित्रिकरण केले होते.

मात्र कोरोना महामारी लागल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपट गृह मध्ये सुरु होत असल्याने या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटामध्ये तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांची भूमिका असणार आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार आणि बॉलिवूडचे कलाकार देखील दिसणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये तेजश्री प्रधान हिने शरमन जोशी याला एक लीप लॉक सीन दिला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.छोट्या पडद्यावर वावरणारी सोज्ज्वळ सून आता बोल्ड सीन देताना दिसणार आहे, असे म्हणून अनेकांनी दिला ट्रोल केले आहे.

Team Hou De Viral