तेजस्विनी पंडीत आणि संजय जाधव प्रेमात ?

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक हिट चित्रपट केलेले आहेत. तेजस्विनी पंडित समांतर या वेबसिरिजमुळे प्रचंड गाजली होती. समांतर या वेब सिरीजमध्ये सध्या तिच्यासोबत सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी हा दिसत आहे. या वेबसीरीजमध्ये तिने स्वप्नील सोबत चुंबन दृश्य देऊन अतिशय धुमाकूळ घातला होता.
काही वर्षांपूर्वी तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने मालिका, नाटक, जाहिरात या सर्व क्षेत्रांमध्ये मुक्त वावर केला. काही वर्षांपूर्वी आलेला “अग बाई अरेच्या” हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर याने भूमिका केली होती. या चित्रपटांमधील संजय नार्वेकर याला बायकांच्या मनातलं सगळं काही कळत असतं.
या चित्रपटामध्ये तेजस्विनी पंडित हिने नकारात्मक भूमिका साकारली होती. ती एका दहशतवादी रुपात या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या कथेनुसार संजय नार्वेकर आणि तेजस्विनी पंडित यांची एकदा गाठ पडते. त्यामुळे तेजस्विनी पंडित हिच्या मनात काय चालले. याबाबत संजय नार्वेकर याला कळते आणि तेजस्विनी हिचा कट उधळला जातो.
या प्रकारे तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपली छोटी मात्र लक्षवेधी भूमिका केली होती. तेजस्विनी पंडित हिने सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर “मी सिंधुताई सपकाळ” या चित्रपटात काम केले होते. आता तेजस्विनी पंडितच्या बाबतीतली एक बातमी समोर आली आहे. तेजस्विनी पंडित आणि संजय जाधव यांच्यामध्ये अफेयर सुरू असल्याची ही बातमी होती.
याबाबत बोलताना तेजस्विनी पंडित हिने एका कार्यक्रमात सांगितले की, असे काही नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. उलट तो माझा दादा आहे. अशा बातम्या कुठून येतात हे मला समजत नाही. आमचे अफेअर कसे काय असू शकते. तो मला भावाप्रमाणे आहे, असे म्हणत तिने आपल्या नात्याविषयी खुलासा केला आहे.