बिगबॉस मधील तेजस्विनी म्हणते ‘मला इंडस्ट्री मध्ये लग्न करायचं नाही…’, कारण इंडस्ट्री मध्ये कोणीच…

बिगबॉस मधील तेजस्विनी म्हणते ‘मला इंडस्ट्री मध्ये लग्न करायचं नाही…’, कारण इंडस्ट्री मध्ये कोणीच…

कलर्स मराठी वर 2 ऑक्टोबरपासून मराठी बिग बॉस चार सुरू झाले आहे. आता या शोमध्ये प्रसाद जवादे, अमृता धोंडगे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशस्वी मसुरेकर यांच्यासह इतर कलाकार सहभागी झाले आहेत.

याआधी गेल्या वर्षी कलर्स मराठीचा बिग बॉसचे तिसरे पर्व देखील खूप गाजले होते. यामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले होते. तिसऱ्या सत्रामध्ये विशाल निकम याने बाजी मारली होती. विशाल निकम याने अतिशय जबरदस्त असे परफॉर्मस यामध्ये दाखवले होते, तर शिवलीला बाळासाहेब पाटील हिच्या सहभागी होण्याने या शोमध्ये एक वेगळीच रंगत आणली होती.

मात्र, एक कीर्तनकार कसे काय या शोमध्ये सहभागी होऊ शकते, असे म्हणून तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्याचप्रमाणे भूमता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील या शोमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. तृप्ती देसाई यांची एन्ट्री देखील या शोमध्ये वादग्रस्त राहिली होती, तर सुरेखा कुडची या कलाकार देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

मीनल शहा, सोनल पाटील, मीरा जगन्नाथ अविष्कार दार्वेकर यांच्यासह इतर कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. आता कलर्स मराठी वर बिग बॉसचे चौथ पर्व हे सुरू झाले आहे. या पर्वामध्ये आणि कलाकार सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये तुंबळ भांडण झाल्याचे आपण पाहिले.

या दोघांमध्ये असे भांडण झाले की अपूर्वा नेमळेकर हिने प्रसाद याला अक्षरशः धारेवर धरल्याचे आपण पाहिले. त्यानंतर प्रसाद हा देखील काही कमी नाही. त्याने देखील अपूर्वा हिला चांगली धारेवर धरले. एकूणच काय तर बिग बॉसच्या चौथ्या सत्राची सुरुवात भांडण झाले, असे म्हणावे लागेल.

तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर यांनी देखील निखिल राजशिर्के याला टॉप कलाकार निवडायला सांगितले होते. मात्र, त्यांनी सगळ्यांचे फोटो लावले होते. त्याला देखील महेश मांजरेकर यांनी चांगलेच झपून काढले होते. तर आता बिग बॉसचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये तेजस्विनी ही गॉसिपिंग करताना दिसत आहे.

तेजस्विनी सोबत तिची मैत्रीण देखील यामध्ये सहभागी झाली आहे. यामध्ये तेजस्विनी ही सांगत आहे की, लग्नबाबत माझा अजून तरी काही विचार नाही. मी मनोरंजन क्षेत्रामध्ये लग्न मात्र काही करणार नाही. म्हणून या क्षेत्रामध्ये लग्न करायचे मला आवडणार नाही. माझ्या भावाचे लग्न झाले असून त्याला एक बेबी देखील आहे, असे तिने सांगितले.

माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे. मात्र त्याला मुलगी झाली आहे. त्याने लवकर लग्न केले आहे, असे ती म्हणत आहे. एकूणच काय तेजस्विनी हिचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे, तर बिग बॉस आपण पाहता का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral