‘तेजस्विनी पंडित’ सोबत घडलीये अशी धक्कादायक घटना, हॉकी स्टिकने मारहाण…

‘तेजस्विनी पंडित’ सोबत घडलीये अशी धक्कादायक घटना, हॉकी स्टिकने मारहाण…

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये तेजस्विनी पंडित हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक हिट चित्रपट केलेले आहेत. तेजस्विनी पंडित सध्या समांतर या वेबसिरिजमुळे प्रचंड गाजली आहे. समांतर या वेब सिरीजमध्ये तिच्यासोबत सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी हा दिसत आहे.

या वेबसीरीजमध्ये तिने स्वप्नील सोबत चुंबन दृश्य देऊन अतिशय धुमाकूळ घातला होता. काही वर्षांपूर्वी तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने मालिका, नाटक, जाहिरात या सर्व क्षेत्रांमध्ये मुक्त वावर केला. काही वर्षांपूर्वी आलेला “अग बाई अरेच्या” हा चित्रपट आपल्याला आठवत असेल.

या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर याने भूमिका केली होती. या चित्रपटांमधील संजय नार्वेकर याला बायकांच्या मनातलं सगळं काही कळत असतं. या चित्रपटामध्ये तेजस्विनी पंडित हिने नकारात्मक भूमिका साकारली होती. ती एका दहशतवादी रुपात या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या कथेनुसार संजय नार्वेकर आणि तेजस्विनी पंडित यांची एकदा गाठ पडते.

त्यामुळे तेजस्विनी पंडित हिच्या मनात काय चालले. याबाबत संजय नार्वेकर याला कळते आणि तेजस्विनी हिचा कट उधळला जातो. या प्रकारे तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपली छोटी मात्र लक्षवेधी भूमिका केली होती. तेजस्विनी पंडित हिने सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर “मी सिंधुताई सपकाळ” या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटात तिने काम केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटानंतर ती रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिला मागे वळून पाहायची गरज पडली नाही. तेजस्विनी पंडितच्या आईचे नाव ज्योती चांदेकर असे आहे. ज्योती चांदेकर यांनी देखील अनेक मराठी चित्रपट मालिका मध्ये काम केलेले आहे. त्यांनी काम केलेले सर्व चित्रपट हिट ठरले आहेत.

आईच्या पावलावर पाऊल ठेवून तेजस्विनी पंडित आज मराठी चित्रपट सृष्टी मध्ये लोकप्रिय झालेली आहे. त्यानंतर तिने “तुही रे” या चित्रपटात काम केले. तिचा तुही रे हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर तिने हंड्रेड डेज सारख्या मालिकेत देखील काम केले होते.

तेजस्विनी पंडित हिच्या बाबतीतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ म्हणजे तेजस्विनी पंडित हिला कॉलेजमध्ये असताना हॉकी स्टिकने मार खावा लागला होता. तेजस्विनी पंडित आणि तिची मैत्रीण कॉलेजला जात असताना काही मुलांनी तिच्या मैत्रिणीला छेडले होते. त्यानंतर तेजस्विनी पंडित हिने त्या मुलांना समजावून सांगितले होते.

मात्र, झाले उलटेच संध्याकाळी तेजस्विनी पंडिती घरी आल्यानंतर त्याच मुलांनी तिच्या घरी येऊन तेजस्विनी पंडित हिला हॉकी स्टिकने मारहाण केली. त्यानंतर तेजस्विनी हिच्या आईने सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तेजस्विनी हिने झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तेजस्विनीच्या हातात एक काठी दिली आणि त्या मुलांना जोडून काढायला सांगितले.

त्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढला, असे तिने सांगितले. असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Team Hou De Viral