तुला सनी लिओनी वैगरे व्हायचे आहे का?; हॉट फोटोमुळे ही मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

तुला सनी लिओनी वैगरे व्हायचे आहे का?; हॉट फोटोमुळे ही मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीत देखील आता अनेक अभिनेत्री या बिनधास्त आणि बोल्ड वावरत आहेत. अनेक अभिनेत्री या बोल्ड सीन देखील चित्रपटात देताना दिसत असतात. मराठी चित्रपटसृष्टीत चुंबन दृश्य देण्याची फॅशन निर्माण झाली आहे.

काही वर्षांपूर्वी दुनियादारी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी यांच्या मध्ये किसिंग सीन दाखवण्यात आला. किसिंग सीन व्हायरल झाल्यानंतर मराठी चित्रपटातही असे सीन देण्याला प्रेक्षकांची काही हरकत नसल्याचे दिसत आहे.

आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये मराठी चित्रपटसृष्टी मधील अशा एका दिग्गज अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीने अनेक चित्रपट, मालिका, मॉडेलिंग सगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. मात्र, तिने नुकतेच काही फोटोशूट केले आहे. त्यावरून ती चांगलीच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अभिनेत्रीचे नाव तेजस्विनी पंडित असे आहे.

तेजस्विनी पंडित ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तेजस्विनी पंडित हिने काही वर्षांपूर्वी ‘अंगबाई अरेच्या’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. अंग बाई अरेच्या या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर यांची प्रमुख भूमिका होती.

या चित्रपटात तेजस्विनी पंडित हिने एका दहशतवादी महिलेची भूमिका साकारली होती. मात्र, संजय नार्वेकर तिचा बुरखा टराटरा फाडून समाजासमोर तिचे सत्य आणतो. या चित्रपटानंतर तेजस्विनी हिला आणि चित्रपट आणि मालिकांच्या ऑफर देखील मिळाल्या. मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती सिंधुताई सपकाळ या चित्रपटातून.

या चित्रपटात तिने सिंधुताई अशा प्रकारे साकारली की ही भूमिका अजरामर ठरली. गेल्या वर्षीच्या सुमारास तेजस्विनी पंडित हिने वेब सिरीज मध्ये देखील काम करायला सुरुवात केली. समांतर या वेब सिरीज मध्ये ती आपल्या दिसली. यात स्वप्निल जोशी याची प्रमुख भूमिका होती. त्याचप्रमाणे जयंत सावरकर यांची देखील या वेबसिरीज मध्ये जबरदस्त अशी भूमिका होती.

दुसर्‍या भागामध्ये नितीश भारद्वाज हे देखील आपल्याला समांतर मध्ये दिसलेले आहेत. पहिल्या भागामध्ये स्वप्निल जोशी सोबत तेजस्विनी पंडित हिने जोरदार असा किसिंग सीन दिला होता. या किसिंग सीनची चर्चा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक दिवस सुरू होती.

आता तेजस्विनी पंडित हिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे बोल्ड अंदाजामध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अतिशय ब्यूटीफुल आणि सेक्सी दिसत आहे. या फोटो अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करताना म्हटले आहे.

तुला काय सनी लियोनी व्हायचे आहे का? तुला असे फोटो टाकणे शोभत नाही, तर अनेकांनी तिच्या फोटोला लाईक केले आहे.

Sayali