साऊथ सिनेसृष्टी हादरली ! कुटुंबासोबतची होळी ठरली शेवटची, घरी परतताना अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

साऊथ सिनेसृष्टी हादरली ! कुटुंबासोबतची होळी ठरली शेवटची, घरी परतताना अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

गानकोकिळा लता मंगशेकर, अभिनेते रमेश देव यांच्या नंतर आणखी एका अभिनेत्रीचे अपघाती निधन झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. गेल्या काही महिन्यात अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. यात ऋषी कपूर, इरफान खान, श्रवण राठोड, बप्प्पी लहिरी यांचेही नुकतचे निधन झाले आहे.

ही अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय होती. या अभिनेत्रीचे नाव गायत्री उर्फ डॉली डीक्रूज असे होते. गायत्रीला तिच्या यूट्यूब चॅनलवरून लोकप्रियता मिळाली होती. ती सोशल मीडियावर ही खूपच सक्रिय होती. आणि सोशल मीडियावरही तिचे चांगलेच फॅन फॉलोइंग होते. गायत्रीने अनेक शॉर्ट फिल्मसमध्ये काम केले आहे.

चहात्यांना गायत्रीचे फोटो आणि व्हिडिओ खूपच आवडायचे. शुक्रवारी रात्री होळी साजरी करून तिच्या घरातून परतत होती. या वेळी तिचा मित्र गाडी चालवत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, काही अंतर पार केल्यानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन आदळली.

गायत्रीला जागीच ठार झाली, तर तिच्या मित्राला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टर त्याला वाचू शकले नाहीत. याच अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

गायत्री फक्त सव्वीस वर्षांची होती.

गायत्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी दुखा:त आहे. गायत्रीने लहान वयातच या जगाचा निरोप घेतल्यामुळे तिचे चाहते अतिशय दुःखी आहेत. गायत्रीच्या मृत्यूची बातमी तिच्या शोमध्ये आईची भूमिका करणारी तिची मैत्रीण आणि सहअभिनेत्री सुरेखा वाणी यांनी शेअर केली. त्या म्हणल्या की तू आम्हाला इतक्या लवकर सोडून कसं जाऊ शकतेस.

आपण एकत्र खूप छान वेळ घालवला आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही, तुझ्या सोबत खूप काही शेअर करायचे होते. तू आम्हाला खूप लवकर सोडून गेली आहेस. मी तुला नेहमी मिस करेन, अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

Team Hou De Viral