‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्रीवर भडकले लोक, मोठ्या प्रमाणात होतेय टीका

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्रीवर भडकले लोक, मोठ्या प्रमाणात होतेय टीका

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या ठिपक्याच्या रांगोळी या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीवर प्रेक्षक चांगलेच भडकल्याचे समोर आलेले आहे. या मालिकेवरील एका अभिनेत्रीने चक्क एक प्रकार केला असल्याचे समोर आले आहे.

याबद्दलच आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीने आपल्या ब्लाऊजवर अंबाबाईचा फोटो लावला आहे. त्यामुळे प्रेक्षक चांगले संतापल्याचे समोर येत आहे. ठिपक्याची रांगोळी ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यामध्ये आपल्याला शशांक आणि अपूर्वा यांची जोडी लोकप्रिय होताना दिसत आहे.

या मालिकेमध्ये दोघांनी देखील अतिशय लोकप्रिय अशा भूमिका साकारल्या आहेत. शशांकची भूमिका अभिनेता चेतन वडनेरे याने साकारली आहे, तर अपूर्वाच्या भूमिकेमध्ये आपल्याला ज्ञानदा रामतीर्थकर ही दिसली आहे, तर या मालिकेतील इतर भूमिका देखील लोकप्रिय होताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये आपल्याला बऱ्याच दिवसानंतर अभिनेते शरद पोंक्षे हे दिसले आहेत.

त्यांनी देखील अतिशय जबरदस्त अशी भूमिका या मालिकेमध्ये केली आहे. आता या मालिकेतील एका अभिनेत्रीवर प्रेक्षक चांगले भडकले आहेत. या अभिनेत्रीने केळवणा प्रकार केला आहे. याआधी देखील एका अभिनेत्रीने असाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्यावरही प्रेक्षक प्रचंड भडकले होते. या अभिनेत्रीचे नाव सुखदा खांडकेकर असे होते.

सुखदाने देखील आपल्या ब्लाऊज वर महालक्ष्मीचा फोटो लावला होता. त्यानंतर तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या या फोटोवर प्रेक्षक प्रचंड भडकले होते. तिला अनेकांनी शिव्या देखील घातल्या होत्या, तर काही प्रेक्षकांनी मात्र तिचे समर्थन केले होते. आता देखील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीवर प्रेक्षक चांगलेच संतापल्याचे समोर आले आहे.

या अभिनेत्रीचे नाव नम्रता प्रधान असे आहे. नम्रता प्रधान हे या मालिकेत सुमीची भूमिका साकारली आहे, तर नम्रता प्रधान हिने आपल्या ब्लाऊज वर अंबाबाईचा फोटो लावलेला आहे. आणि नवरात्री स्पेशल असे म्हटले आहे. तर तिच्या या फोटोवर प्रेक्षक चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळत आहेत.

अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली आहे, तर काही जणांनी मात्र तिचे कौतुक केले आहे. तर आपले यावर काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral