‘The Kashmir Files’ साठी मुलाखत ! चिन्मय मांडलेकरच्या ‘त्या’ कृतीचे होत आहे सर्वत्र कौतुक

‘The Kashmir Files’ साठी मुलाखत ! चिन्मय मांडलेकरच्या ‘त्या’ कृतीचे होत आहे सर्वत्र कौतुक

सध्या सर्वत्र एकच चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. तो म्हणजे द कश्मीर फाईल्स ( The Kashmir Files ). या चित्रपटात कृष्णा या तरुण विद्यार्थ्यांच्या प्रवासा भोवती फिरतो. प्रोफेसर राधिका मेनन कडून प्रथम त्याचा ब्रेनवॉश केला जातो. परंतु शेवटी काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे सत्य त्यांच्या पुढे येते. जो ते तो इतरांपुढे मांडतो.

हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या नारासंहाराचे आणि हजारो बालक, वृध्द आणि महिलांवर झालेल्या अत्याचारांचे चित्र मांडतो. वास्तवाचे एवढे उत्कृष्ट कथानक या चित्रपटात सादर करण्यात आले आहे की, हा चित्रपट पाहताना देखील प्रेक्षकांच्या डोळ्यात आसवं आल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने केले असून कथा सौरभ पांडे आणि विवेक अग्निहोत्री यांचीच आहे.

या चित्रपटात जम्मू आणि काश्मीर मधील उग्रवादा दरम्यान पीडित काश्मिरी पंडित यांच्या पलायनाचे चित्रण दाखवले गेले आहे. द काश्मिर फाईल्स या चित्रपटाची देशभरात सोशल मीडियावरील बरीच चर्चा रंगली आहे. या सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करतात तर काहीजण या सिनेमाला ट्रोल करत आहेत.

अशा या सिनेमातील एका कलाकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्या कलाकाराचे कौतुक केले आहे. यामध्ये पावनखिंड ( Pawankhind ) सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे सुद्धा आहेत. दिग्पाल यांनी अभिनेता चिन्मय मांडलेकर ( Chinmay Mandlekar )यांचे कौतुक केले आहे. चिन्मयने या चित्रपटात फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका साकारली. त्याने साकारलेल्या भूमिकेचे सर्वजण विशेष कौतुक करतात.

एका मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलेल्या कृतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे‌. या मुलाखतीत अॅंकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी शब्दात केला आहे. चिन्मयने त्या अॅंकरला थांबवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा, असे फार प्रेमळ शब्दांत सांगितलं. त्याच्या कृतीतून सर्वत्र कौतुक होत आहे. चाहते त्याच्या महाराजांबद्दलच्या आदराने प्रेमाने भारावून गेले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ शेअर करत दिग्पालने म्हटले आहे की, निव्वळ अभिमान निव्वळ अभिमान… मित्रा चिन्मय.. माझ्या माहितीतला सर्वोत्कृष्ट अभिनेता, माझ्या जवळचा मित्र, माझा भाऊ म्हणून तुझा अभिमान होताच. परंतु आजच्या या कृतीने यशाच्या वेगळ्या शिखरावर असताना सुद्धा तू आपल्या दैवताला विसरला नाहीयेस.

हे पाहून अभिमानाने ऊर भरून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या पदरात अशाच प्रकारच्या यशाच्या ओंजळीचा कृपाप्रसाद घालत राहोत. ही त्यांच्या चरणी प्रार्थना… जय शिवराय.. हर हर महादेव.. असं दिग्पाल लांजेकर यांनी म्हटले आहे. दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

दरम्यान दिग्पाल लांजेवार यांच्या पावनखिंड या चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

Team Hou De Viral