एक दोन नव्हे तर चक्क ‘या’ पाच मालिकांवर प्रेक्षक भडकले, म्हणाले बंद करून टाका या मालिका….

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका या सुरू आहेत. मात्र, अनेक मालिकांचे कथानक हे एक सारखेच असल्याने अनेक मालिकांवर आता टीका देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षापासून आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार, रंग माझा वेगळा या मालिका सुरू आहेत.
या मालिकांमध्ये आता तोच तो पणा खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे प्रेक्षक देखील आता नाराज होत असल्याचे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे या मालिकांवर टीका देखील खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे दिसत आहे. आता देखील प्रेक्षक या मालिकांवर चांगले भडकलेले आहेत आणि या मालिका ताबडतोब बंद करा अनेक मालिकांमध्ये लफडे दाखवण्यात येत आहेत, असे प्रेक्षकांनी म्हणून टीका केली आहे.
रंग माझा वेगळा ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. या मालिकेमध्ये अतिशय भरकटलेली कथा सध्या दाखवण्यात येत असल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे. कार्तिक आणि दीपा यांची यामध्ये काही तरीच दाखवण्यात आले आहे. आता तोच तो पणा या मालिकेत आल्याचे प्रेक्षक म्हणत आहेत आणि ताबडतोब ही मालिका बंद करा, असे देखील आता म्हणतात.
त्याचप्रमाणे आई कुठे काय करते या मालिकेवर प्रेक्षक चांगले भडकल्याचे दिसत आहेत. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये एका मागून एक लफडे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे या मालिकेत नुसते लफडेच दाखवणार का? असे म्हणूनही प्रेक्षक चांगले संतापलेले आहेत. मालिकेत काहीतरी वेगळे दाखवा. नाहीतर ही मालिका ताबडतोब बंद करा, असे म्हणून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
त्याचप्रमाणे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये कटकारस्थान या पलीकडे काहीही दाखवण्यात येत नाही. या मालिकेमध्ये भले मोठे कुटुंब दाखवण्यात आले आहे. मात्र, या मालिकेची कथा देखील भरडण्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे. त्याचप्रमाणे महेश कोठारे यांच्या बॅनरखाली तयार झालेली सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका देखील आता भरकट चालल्याचे दिसत आहे.
कारण या मालिकेमध्ये शालिनी ही सारखे कट कारस्थान करते. मात्र, तिच्या बाबतीत काहीही होत नाही. तिला एकदाचे काहीतरी करा नाहीतर त्या मालिकेला संपवून टाका, असा सूर प्रेक्षकांनी लावला आहे, तर दुसरीकडे कलर्स मराठी वर सुरू असलेली राजा राणीची जोडी ही मालिका ही आता रटाळ होत असल्याचे दिसत आहे.
ही मालिका देखील आता तातडीने बंद करा, असे प्रेक्षक म्हणत आहेत. तर निर्माते आता प्रेक्षकांच्या मागणीला न्याय देतात का? आपला मालिकेचा टीआरपी चांगला आहे म्हणून मालिका सुरूच ठेवतात हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे.