मुलांना कशा मुली आवडतात ??, ‘बिगबॉस मराठी’ च्या घरात भलतीच चर्चा

मुलांना कशा मुली आवडतात ??, ‘बिगबॉस मराठी’ च्या घरात भलतीच चर्चा

प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत असलेला कलर्स मराठी वरील बिग बॉस हा शो 2 ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठीमधील हे चौथे सत्र आहे. चौथ्या सत्रामध्ये आता अनेक कलाकार सहभागी झाले आहेत.

अपूर्वा नेमळेकर, प्रसाद जवादे, किरण माने, रुचिरा, तेजस्विनी लोणारे, विकास पाटील, समृद्धी जाधव, अपूर्वा देशमुख यांच्यासह इतर कलाकार या शोमध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र, या शोमध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत चढत असल्याचे दिसत आहे. कारण या शोमध्ये आता वाद विवादाचे प्रसंग देखील मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत.

तसेच सहभागी झालेले कलाकार देखील आता मोठ्या प्रमाणात चर्चा देखील करताना दिसत आहेत. अलीकडेच एक चर्चा अतिशय रंगात आल्याचे पाहायला मिळाली होती. यावेळेस रुचिरा हिने आपल्याला आवडत असलेल्या पेंटिंग बद्दल माहिती दिली होती, तर तेजस्विनी ही देखील आपण करत असलेल्या पेंटिंग, ड्रॉईंग आणि इतर कलागुणांविषयी आपल्या सहकाऱ्यांना माहिती दिली होती.

तर बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये प्रचंड वाद झाल्याचे पाहायला मिळाले. अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये एका विषयावरून जोरदार राडा झाला होता. यावेळेस प्रसाद याच्यावर अपूर्वा खूपच भडकल्याचे पहायला मिळाले.

त्यानंतर तिने त्याला खूपच सुनावल्याचे देखील दिसले तर अलीकडच्याच एका प्रोमोमध्ये असे समोर आले की, किरण माने हे विकास पाटील याला भडकवत असल्याचे समोर आले. विकास पाटील हा अतिशय चांगला सेलिब्रिटी आहे. मात्र त्याला चार दिवसापासून अनेक जण त्रास देत असल्याचे किरण माने यांना निदर्शनास आले.

त्यामुळे किरण माने हे संतापले असून त्याला भडकवत असल्याचे दिसत आहेत, तर अलीकडेच झालेल्या एका चर्चेमध्ये तेजस्विनी लोणारे, रुचिरा, प्रसाद जवादे हे चर्चा करत बसल्याण्याचे दिसत आहेत. यामध्ये मुलांना मुली कशा आवडतात, याबद्दल हे चर्चा करत आहेत, तर यामध्ये प्रसाद हा म्हणताना दिसत आहे की, मला भारत आणि पाश्चात्त्य देश यामधील कॉम्बिनेशन आवडतं आणि दुसरा एक अभिनेता म्हणताना दिसत आहे की, मला माझ्या उंची एवढीच मुलगी हवी आहे.

कारण की ते खूप चांगले दिसतं. थोडी लहान मुलगी असेल तर ते बघायला फार विचित्र वाटतं, असं म्हणत आहेत, तर या मुलांच्या चर्चा ऐकून मुली देखील खूपच अग्रेसर आहेत, असे देखील अभिनेत्री म्हणताना दिसत आहेत, तर आपण कलर्स मराठीवरील बिग बॉस हा शो पाहतात का? याबद्दल आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral