ह्या पाच अभिनेत्रींनी अंडरवर्ल्ड डॉन सोबत संबंध ठेवून करीअरची केली ‘राखरांगोळी’, यातल्या 2 तर मराठी आहेत

ह्या पाच अभिनेत्रींनी अंडरवर्ल्ड डॉन सोबत संबंध ठेवून करीअरची केली ‘राखरांगोळी’, यातल्या 2 तर मराठी आहेत

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे नाते हे फार जुने आहे. पार ८० ते ९० च्या दशकामध्ये बॉलीवूड आणि गुंडांमध्ये नाते हे सर्व श्रुत होते. गुंडांच्या जीवनशैलीवर अनेक चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार झाले. हाजी मस्तान याच्या जीवनावरच जुन्या काळामध्ये एक चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाने तुफान यश मिळवले होते.

त्याचप्रमाणे रामगोपाल वर्मा याने देखील कंपनी, डी आणि इतर चित्रपट देखील तयार केले. या चित्रपटामध्ये अंडरवर्ल्डचे खरे चित्र दाखवण्यात आले होते. तसेच अभिनेत्री आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यातील संबंध असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकलेल्या असतील. अनेक डॉन यांनी चित्रपटासाठी पैसा लावून लाखो रुपये कमावले.

त्याचप्रमाणे चित्रपटात काम करण्यासाठी अनेक कलाकारांना धमकावणे देखील काही वर्षांपूर्वी सुरू होते. मात्र, आता हे चित्र बदलण्याचे गेल्या काही दिवसात दिसत आहे. तरी देखील बॉलीवूडवरील अंडरवर्ल्डचा प्रभाव काही कमी झाला नाही. आज आम्ही आपल्याला बॉलीवूडच्या अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, ज्यांनी आपल्या आयुष्याची गाठ अंडरवर्ल्ड डॉन सोबत बांधली आहे. चला तर मग जाणून घेऊया.. कोण आहेत त्या अभिनेत्री.

सोना – 70 ते 80 च्या दशकामध्ये सोना ही अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय ठरली होती. सोनाचे त्या काळामध्ये हाजी मस्तान याच्यासोबत लग्न झाल्याच्या चर्चा होत्या. ती त्याच्यासोबत अनेक वर्ष रिलेशनशिप मध्ये होती. या दोघांची भेट एका चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान झाली. मात्र, हाजी मस्तान याचे आधीपासूनच लग्न झाले होते. त्यामुळे या दोघांना लग्न करता आले नाही. मात्र, तरी देखील या दोघांचे नाते हे खूप चर्चेत राहिले. हाजी मस्तानाच्या मृत्यूनंतर सोना हिचे खूप हाल झाल्याचे सांगण्यात येते.

मोनिका बेदी – मोनिका बेदी हे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यासोबत जोडले गेले होते. या दोघांनी लग्न देखील केले होते. अमेरिकेमध्ये एका पार्टीमध्ये या दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मोनिका हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. अबू सालेम याच्या सांगण्यावरूनच तिला अनेक चित्रपटात काम मिळाले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. मात्र, तिची सुटका करण्यात आली. त्यानंतर तिने अबु सालेम याच्यासोबत आपले नाते संपुष्टात आणले. सध्या अबू तुरुंगात आहे.

मंदाकिनी – मंदाकिनी हे असे नाव आहे की जे एका रात्रीत स्टार बनली होती. मंदाकिनी हिचे आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत संबंध असल्याचे सांगण्यात येत होते. या दोघांनी गपचूप लग्न देखील केल्याचे बोलले जाते. अनेकदा या दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. एका मॅच दरम्यान या दोघांना पाहण्यात आले होते. हाच फोटो आजही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतो.

उर्मिला मार्तोंडकर – उर्मिलाचे आता लग्न झाले असले तरी उर्मिलाचे नाव ९० च्या दशकामध्ये प्रचंड चर्चेत आले होते. उर्मिला आणि दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये प्रेम संबंध असल्याचे चर्चा त्यावेळेस रंगल्या होत्या. उर्मिला आणि दाऊद इब्राहिम या दोघांनी साखरपुडा देखील केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पुढे त्यांची काही बात बनली नाही. त्यानंतर उर्मिला हिने दाऊद सोबत असलेले आपले संबंध तोडले असे देखील सांगण्यात येते.

ममता कुलकर्णी – ममता कुलकर्णी हिला बॉलीवूड मध्ये कोण ओळखत नाही. ममता कुलकर्णी हिने 90 ते 2000 च्या काळामध्ये अनेक चित्रपटात काम केले. तिने काम केलेले सगळे चित्रपट हिट राहिले होते. मात्र, विकी गोसावी याच्यासोबत संबंध जोडल्यानंतर तिचे नाव चर्चेत आले. या दोघांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर ममता कुलकर्णी हिने विकी गोस्वामी याच्या सोबतचे आपले संबंध संपुष्टात आणले. धक्कादायक म्हणजे ममता कुलकर्णी हिने मुस्लिम धर्म स्वीकारला होता, असे देखील सांगण्यात येते.

Team Hou De Viral