ह्या रिअल ‘नवरा-बायको’ च्या जोड्या गाजवत आहेत मराठी मालिका, 3 नंबर वाली तर…

ह्या रिअल ‘नवरा-बायको’ च्या जोड्या गाजवत आहेत मराठी मालिका, 3 नंबर वाली तर…

सध्या मलिका विश्वामध्ये खऱ्या आयुष्यातील नवरा-बायकोंच्या जोड्या चांगल्याच गाजत आहेत. आपण अनेक हिंदी व मराठी मालिका पाहत असतो या मालिका पहात असताना आपणास क्वचित प्रसंगी हे माहिती होते की या मालिकेतील नवरा बायकोचे पात्र निभावणारे कलाकार देखील वास्तव जीवनात नवरा-बायको असतात.

आज आपण अशाच काही मराठी मालिका मधील अभिनेता व अभिनेत्री ज्या खऱ्या आयुष्यातील नवरा बायको ची जोडी मालिकांमध्ये देखील यशस्वीरित्या काम करत आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत .मराठी मालिकांमध्ये तीन लोकप्रिय खऱ्या आयुष्यातील नवरा-बायको कलाकारांच्या जोड्या चांगलेच गाजत आहेत तर पाहुयात कोण आहेत हे कलाकार.

1) शंतनू मोघे आणि अभिनेत्री प्रिया मराठे – सध्या अभिनेता शंतनु मोघे आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अविनाश ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे तर त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया मराठे ही तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका हे पात्र साकारत आहे. प्रिया मराठे हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्रियाची सर्वात लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे तू तिथे मी. प्रियाने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे कसम से, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते है.

2) गुरू दिवेकर आणि अभिनेत्री मधुरा जोशी – ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अभिनेता गुरु दिवेकर निखिलचे पात्र निभावत आहे. तर अभिनेत्री मधुरा जोशी फुलाला सुगंध मातीचा मालिकेत इमलीची भूमिका साकारत आहे. या दोघांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

3) मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना कदम – सध्या हे दोघेही ठिपक्यांची रांगोळी प्रसिद्ध मालिकेत शशांकच्या आई वडिलांची भूमिका साकारत आहेत. लीना कदम यांनी याआधी होणार सुन मी या घरची मालिकेत काम केले आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतही काम केले आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी आहे. चाहत्यांची लाडकी मालिका आहे असे म्हणावयास हरकत नाही.

फार कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे कौटुंबिक वातावरण हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे या मालिकेतील विठू बाबा आणि सुवा आई म्हणजेच लीना कदम मंगेश कदम हे आहेत. एकूणच पती-पत्नी असलेले अभिनेता आणि अभिनेत्री मालिका विश्वात सध्या आपले नाव गाजवत आहेत.

Team Hou De Viral