‘ठिपक्याची रांगोळी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अश्याप्रकारे होणार मालिकेचा शेवट

‘ठिपक्याची रांगोळी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अश्याप्रकारे होणार मालिकेचा शेवट

मराठी मालिका विश्वामध्ये सध्या अनेक मालिका या बंद पडताना दिसत आहेत. टीआरपी न मिळाल्याने या मालिका बंद पडत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. अनेक मालिकांना सध्या टीआरपी नाही. त्यामुळे या मालिकेचा टाइमिंग तरी बदलण्यात येत आहे किंवा त्या मालिका बंद तरी करण्यात येत आहे.

देव माणूस या मालिकेची वेळ आता बदलण्यात येत आहे. दुसरीकडे ठिपक्याची रांगोळी ही मालिका देखील आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण या मालिकेचा शेवट कशा पद्धतीने होणार याबाबत चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झालेली आहे. मात्र, ही मालिका कधी बंद होणार याबाबत अजून जाहीर करण्यात आले नाही.

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अपूर्वा आणि शशांक यांची प्रेम कहानी दाखवण्यात आलेली आहे. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेची कथा अतिशय लोकप्रिय अशी आहे.

मालिकेमध्ये कानिटकर कुटुंबीय दाखवण्यात आले आहे, तर दुसरीकडे नेत्रा ही देखील शंशाकच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणार असल्याचे देखील दिसणार आहे. या मालिकेमध्ये शशांकची भूमिका अभिनेता चेतन वडनेरे याने केली आहे. चेतन वडणेरे हा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांना माहिती देखील देत असतो.

चेतन वडणेरे याचे ऋतुजा धारप हिच्यासोबत सध्या प्रेम प्रकरण सुरू असून लवकरच तो तिच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका लवकरच संपणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून आहे. या मालिकेचा शेवट कसा होणार याबाबतचे व्हिडिओ देखील आता सोशल मिडीयावर शेअर करण्यात येत आहेत.

तर या मालिकेचा शेवट असा होणार आहे. अपूर्वा आणि शशांक यांचे लग्न होणार आहे. लग्न झाल्यानंतर अपूर्वा ही कानिटकर कुटुंबांमध्ये रममाण होताना दिसत आहे. अपूर्वा श्रीमंत घरची असल्याने तिला कसे वागायचे याबाबत शशांक हा पुढे ट्रेनिंग देताना देखील दिसेल. मात्र, सध्यातरी शशांक हा या लग्नावर फारसा खुश नाही. याचे कारण मालिकेत लवकरच कळणार आहे.

अपूर्वा आणि शशांक यांच्या लग्नाने सर्व कानिटकर कुटुंब खूश असले तरी दुसरीकडे नेत्रा मात्र नाराज झालेली आहे. नेत्रा ही शशांक यांना भेटून सांगते की, मला तू फसवलस. माझ्यासोबत तू लग्न करणार होतास. आता काय झाले, असा जाब विचारते. त्यावर शशांक म्हणतो की, माझे अपूर्वावर प्रेम आहे. मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. त्यानंतर नेत्रा ही खुप चिडते आणि त्याला म्हणते की, मी तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार देणार आहे.

त्यानंतर नेत्रा ही पोलिसात जाऊन शशांक विरोधात तक्रार देते. या तक्रारीत ती म्हणते की, लग्नाचे आमिष दाखवून मला शशांकने फसवले आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा‌‌. पोलिस त्या पद्धतीने गुन्हा दाखल करतात आणि शशांक याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी जातात. त्यानंतर त्याला अटकही करण्यात येते. त्यानंतर कानिटकर कुटुंब हे प्रचंड घाबरले असते.

या कठीण काळामध्ये पूर्ण कानिटकर कुटुंब हे शशांकच्या बाजूने उभे राहतात. तर अपूर्वा देखील त्याला खूप साथ देते. हे प्रकरण नंतर न्यायालयात जाते. न्यायालयात गेल्यानंतर शशांक याची निर्दोष मुक्तता करण्यात येते. त्यानंतर शशांक हा अपूर्वा याचे आभार देखील मानतो. त्यानंतर एक दिवस काम करताना अपूर्वाला चक्कर येते.

त्यामुळे कानिटकर कुटुंब घाबरून जाते आणि तिला दवाखान्यात दाखल करून तिच्या चाचण्या करते. त्यानंतर ती आई होणार असे समजते. कानिटकर कुटुंब हे एकदम आनंदात राहते. अपूर्वाला शशांक हा घरामध्ये कसे वागायचे ते याबाबत देखील सांगतो. त्यानंतर या घरात एक चिमुकल्याचे आगमन होते. अशा पद्धतीने या मालिकेचा शेवट होणार आहे.

Ambadas