‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत शशांक च्या ‘या’ निर्णयामुळे कानिटकर कुटुंबात पडणार फूट, मालिका घेणार धक्कादायक वळण

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत शशांक च्या ‘या’ निर्णयामुळे कानिटकर कुटुंबात पडणार फूट, मालिका घेणार धक्कादायक वळण

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सध्या लोकप्रिय झाली आहे. ही मालिका घराघरात पाहिल्या जात आहे. या मालिकेमध्ये शशांक आणि अपूर्वा ची कहाणी दाखवण्यात आली आहे.

शशांकची भूमिका अभिनेता चेतन वडनेरे यांनी केली आहे, तर अपूर्वाच्या भूमिकेमध्ये ज्ञानदा रामतिर्थकर ही दिसली आहे. या दोघांची केमिस्ट्री देखील मालिकेत आता खूपच रंगताना दिसत आहे. या मालिकेवरुन काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी टीका देखील केली होती. कारण की या मालिकेमध्ये शशांक हा विनायक यांना आता दादा म्हणताना दिसत आहे.

मात्र ज्यावेळेस मालिका ही सुरू झाली होती. त्यावेळेस सुरुवातीला विनायक अण्णा असे म्हणायचा. त्यामुळे प्रेक्षकांनी ही चूक लक्षात आणून दिली, असे असले तरी ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत तिचे पात्र देखील प्रेक्षकांना खूपच आवडते. मध्यंतरी ही मालिका संपणार असे सांगण्यात येत होते.

मात्र, आता या मालिकेचे एकेक भाग हे वाढत आहेत. त्यामुळे ही मालिका आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. या मालिकेत काम करणारी अपूर्वा म्हणजेच ज्ञानदा रामतिर्थकर हिने या आधी देखील अनेक मालिका, चित्रपटांत काम केले आहे. तिने जिंदगी नॉट आउट, शतदा प्रेम करावे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

त्याचप्रमाणे शादी मुबारक, धुरळा, दिल दोस्ती दुनियादारी, यासारखे चित्रपटातही तिने काम केले आहे. त्याचप्रमाणे जवळी रहा, प्रेमाची आरती यासारख्या म्युझिक अल्बम मध्ये देखील काम केले आहे. आता ठीपक्यांची रांगोळी मालिकेत एक मजेशीर प्रसंग आला आहे. त्यामुळे पुढे या मालिकेत काय होणार हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे.

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका स्टार प्रवाहवर लोकप्रिय मालिका आहे. एकत्र कुटुंब आणि कुटुंबातील सर्वांची धमाल-मस्ती यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडली आहे. आणि आप्पू तिचा खडूस यांच्यातली केमिस्ट्री चांगलीच रंगत आहे. कुकी आणि त्याच्या गॅंग मुळे या वेळेस शशांकला मीटिंग जायला उशीर झाला.

त्यामुळे शशांक हा चांगलाच भडकतो आणि कुकी याला काहीतरी बोलुन जातो. त्यामुळे तो खूपच दुखावतो आणि त्याला तो बोलत नाही. त्यामुळे आता मालिकेमध्ये वेगळे वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे कुकी हा सांगतो की, आता माझी देखील ट्रान्सफर झाली आहे. त्यामुळे मी देखील हे घर सोडून जाणार आहे.

त्यावर शशांक त्याला म्हणतो की, तू जर ट्रान्सफर घेतलीस तर मी अमेरिकेला निघून जाईल. त्यामुळे आता कुकी याला थांबवण्यामध्ये अप्पू ही यशस्वी होते का? हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे. एकूणच कानेटकर कुटुंबांमध्ये आता फूट पण पडणार का? हेदेखील पाहणे मजेशीर ठरेल.

Team Hou De Viral