‘ठिपक्यांची रांगोळी’ मधला हा कलाकार आला मरणाच्या दारातून परत, धक्कादायक अनुभव

‘ठिपक्यांची रांगोळी’ मधला हा कलाकार आला मरणाच्या दारातून परत, धक्कादायक अनुभव

सध्या छोट्या पडद्यावर ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगले मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या लक्षणीय, प्रेक्षणीय अशा झालेलिया आहेत. या मालिकेमध्ये एक काम करणारे कलाकार एका दुर्धर आजारातून बाहेर आलेले आहेत. याबद्दल त्यांनी एकदा माहिती दिली होती. आम्ही आपल्याला या कलाकाराबद्दल माहिती देणार आहोत. हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून शरद पोंक्षे आहेत.

शरद पोंक्षे सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये विनायक कानेटकर ही भूमिका करताना दिसताहेत. विनायक कानेटकर यांनी या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. शरद पोंक्षे हे आपल्या अभिनयासाठी चांगले जाणले जातात. सावरकर यांच्यावरील त्यांचे प्रेम हे सगळ्यांनाच माहीत आहे.

विनायक दामोदर सावरकर यांच्यावर ते अनेकदा व्याख्यान देताना देखील दिसत असतात. त्याचप्रमाणे मी नथुराम गोडसे बोलतोय त्यांचे हे नाटक प्रचंड वादग्रस्त आलेले आहेत‌. ज्या वेळेस त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर अनेकदा हल्ले करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. त्याच प्रमाणे जेथे नाटक सुरू होते तेथे शो उधळण्याचा प्रयत्न देखील करण्यात आले होते.

तरीदेखील शरद पोंक्षे यांनी हार मानली नाही. उंच माझा झोका ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यांनी देखील काम केले होते. त्यांची या मालिकेतील भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. सर्व काही सुरळीत सुरु असताना शरद पोंक्षे यांना एकदम आजाराने ग्रासले. सुरुवातीला त्यांना थकवा यायचा. भूक लागायची नाही. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले.

काहीतरी असेल म्हणून त्यांनी डॉक्टरांना सुद्धा दाखवले नाही. मात्र, हा थकवा आणि शरीराचे दुखणे हे वाढतच गेले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवले, तर त्यांना कॅन्सरच्या आजाराचे निदान झाले होते. 2018 मध्ये शरद पोंक्षे यांना कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले. आपल्याला कॅन्सर झाला आहे, हे ऐकून एखादा व्यक्ती हादरून जातो.

मात्र, शरद पोंक्षे हे अजिबात हादरले नाही. मानसिकरित्या ते एकदम घट्ट राहिले. त्यानंतर चित्रपट सृष्टी पासून ते बराच काळ लांब होते. याचे कारण म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची सहानुभूती नको होती. त्यानंतर त्यांनी कॅन्सर वर मात देखील केली. आता त्यांची प्रकृती एकदम तंदुरुस्त अशी आहे. आपल्या आरोग्याला माणसाने जपावे असे त्यांनी आपल्या संदेशात सांगितले होते.

Team Hou De Viral