‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतुन ‘या’ 2 महत्वाच्या कलाकारांची Exit, समोर आले मोठे कारण

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतुन ‘या’ 2 महत्वाच्या कलाकारांची Exit, समोर आले मोठे कारण

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली ठिपक्यांची रांगोळी ही मालिका गेल्या काही दिवसापासून लोकप्रिय झाली आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर आई कुठे काय करते या मालिकेनंतर सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका म्हणून आता ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने मान मिळवला आहे.

गेल्या काही महिन्यापासून बंद असलेला टीआरपी देखील आता पुन्हा सुरू झाला आहे. टीआरपी पुन्हा सुरू झाल्याने यामध्ये ठिपक्याची रांगोळी या मालिकेने देखील बाजी मारल्याचे आपल्याला दिसत आहेत. या मालिकेमध्ये अपूर्वा आणि शशांक यांची प्रेम कहानी आपल्या दाखवण्यात आली आहे. असे असले तरी कानिटकर कुटुंबीय देखील या मालिकेत विशेष भाव खाताना दिसत आहेत.

या मालिकेत सगळ्याच भूमिका या चांगल्या झालेल्या आहेत. या मालिकेमध्ये शशांकची भूमिका चेतन वडनेरे यांनी साकारली आहे, तर ज्ञानदा रामतिर्थकर हिने अपूर्वा कौशिक वर्तक ही भूमिका साकारली आहे. या मालिकेमध्ये शरद पोंक्षे यांनी देखील अतिशय चांगली भूमिका साकारली आहे. अतुल तोडणकर लीना भागवत यांच्या भूमिकाही लोकप्रिय झालेल्या आहेत.

या मालिकेमध्ये एक जोडी अशी आहे की, जी खरे आयुष्यामध्ये देखील नवरा-बायकोची जोडी आहे आणि मालिकेत देखील ते नवरा बायकोची भूमिका साकारत आहेत. ही जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम यांची. हे दोघेही अभिनेता आणि अभिनेत्री आहेत. अनेक मालिका, चित्रपट नाटकांमध्ये देखील ते काम करताना दिसत असतात.

मात्र, आता गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा सुरू झालेली आहे की, लिना भागवत आणि मंगेश कदम हे दोघेही या मालिकेतून ब्रेक घेण्याची शक्यता आहे. याचे कारणही समोर आलेले आहे. मात्र, या दोघांनी आतापर्यंत या बाबत काही सांगितले नाही. हे दोघेही अभिनेता आणि अभिनेत्री असल्याने त्यांच्याकडे अनेक कामाचे प्रोजेक्ट असतात.

त्यामुळेच त्यांनी आता दुसरा एक प्रोजेक्ट स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील विठ्ठल आणि सुवर्णा कानिटकर म्हणजेच अभिनेता मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत हे दोघे मालिकेतून ब्रेक घेण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे मंगेश आणि लीना यांची प्रमुख भूमिका असलेले आमने सामने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर सुरू झाले आहे.

काही कारणास्तव या नाटकाचे प्रयोग मधल्या काळात बंद झाले होते. परंतु आता पुन्हा एकदा आमने-सामने नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. त्या कारणास्तव मंगेश आणि लीना ठिपक्यांची रांगोळी मालिकेचे शूटिंग मधून ब्रेक घेणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय मंगेश आणि लीना मालिकेतून ब्रेक न घेता मालिका व नाटक या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मेसेज करतील, असे देखील बोलले जाते.

तर तुम्हाला या विषयी काय वाटतं. ठिपक्यांची रांगोळी मधील विठ्ठल सुवर्णाची जोडी तुम्हाला आवडते का ? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral