‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतल्या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतल्या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये सगळ्याच भूमिका या लोकप्रिय ठरल्या आहेत. या मालिकेमध्ये आपल्याला चेतन वडनेरे यांच्या देखील भूमिका दिसत आहेत. मालिकेमध्ये इतर भूमिका या अतिशय चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत काम करणारी बाबी आत्या हिचा एक व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी वायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती आपल्या खऱ्याखुऱ्या पतीसोबत दिसत आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये बाबी आत्याची भूमिका अभिनेत्री सारिका नवाथे यांनी साकारली आहे. सारिका नवाथे हिचा नवा लुक सध्या प्रेक्षकांसमोर आला आहे.

खऱ्या आयुष्यामध्ये बाबी आत्या म्हणजे सारिका या विवाहित असून त्यांच्या पतीचे नाव हर्षवर्धन नवाथे असे आहे. हर्षवर्धन नवाथे यांनी 2000 मध्ये ‘कोन बनेगा करोडपती’ या रिॲलिटी शो मध्ये एक कोटी रुपये जिंकले होते. अनेक जण हे विसरून गेले असतील. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी हे पैसे जिंकले होते. 2007 मध्ये हर्षवर्धन यांनी सारीका हिच्या सोबत लग्न केले.

आता या दोघांना मुले देखील असून हे दोघेही सुखी संसार करत आहेत. हर्षवर्धन सध्या डच रिक्रुटमेंट कंपनीमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम करतात. या दोघांना दोन मुले असून त्यांचे नाव रियांश आणि सारांश असे आहे. सारिका यांनी आधी कुंकू टिकली आणि टॅटू, मोलकरीण बाई, राधा प्रेम रंगीली या सारख्या मालिकांमधून आपण त्यांना काम करताना पाहिले आहे.

आता बाबी आत्या म्हणजे सारिका नवाथे हिच्या बाबतीतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सारिका या अतिशय दुःखी असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे सारिका नावाथे हिच्या सासूबाईचे नुकतेच निधन झाले आहे.

याबाबत सारिका हिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना माहिती देऊन सांगितले आहे की, माझ्या सासूबाई यांचे 21 ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. माझ्या सासुबाई माझ्या खूप चांगल्या मैत्रिण होत्या. त्या मला सुखदुःखामध्ये खूप चांगल्या प्रकारे साथ देत होत्या. मात्र, त्यांच्या अचानक असा निघून जाण्याने आम्हाला दिवाळीत अतिशय संकटाचा सामना करावा लागत आहे, असे सारिका हिने सांगितले आहे.

तर सारिकाच्या सासुबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

Team Hou De Viral