… म्हणून संकर्षण कराडे यांच्या पत्नीचे सर्वत्र होत आहे ‘कौतुक’

… म्हणून संकर्षण कराडे यांच्या पत्नीचे सर्वत्र होत आहे ‘कौतुक’

अभिनेता संकर्षण कराडे हा सध्या झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. संकर्षण कराडे हा मुळातच अतिशय जबरदस्त असा अभिनेता आहे. संकर्षण याने अनेक मालिका आणि टीव्ही शोरूम मधून असल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

माझी तुझी रेशीमगाठीट या मालिकेसह तो किच्चन कल्लाकार या शोमधून देखील तो प्रेक्षकांना भेटत असतो. किचन कल्लाकार या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींना तो बोलते करत असतो. आणि त्यांना कुठल्या रेसिपी आवडतात ते देखील तो सांगत असतो. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सोबतही त्याने या शोमध्ये सूत्रसंचालन केले.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये संकर्षण समीरच्या भूमिकेत दिसत आहे. समीर हा यशचा मित्र असतो आणि त्याला प्रत्येक बाबतीमध्ये मदत करत असतो. त्याचप्रमाणे नेहा हिला देखील तो मदत करताना आपण पाहिले आहे. संकर्षण कराडे हा मूळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याचा रहिवासी आहे.

मराठवाड्यातील अतिशय छोटा जिल्हा अशी या शहराची ओळख आहे. असे असले तरी या शहराने अनेक कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. अजिंक्य राऊत हादेखील परभणी चा रहिवासी आहे. त्याचप्रमाणे इतर इतर काही कलाकार देखील परभणीतून पुढे आले आहेत.

कोरोनाच्या काळामध्ये संकर्षण याने एक कविता सादर केली होती. त्याची ही कविता खूपच व्हायरल झाली होती. विठ्ठलाकडे वारी बद्दल एक वारकरी मागणे मागतो, अशी ती कविता होती आणि ही कविता पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अनेक कलाकारांनी देखील संकर्षणच्या या कवितेसाठी कौतुक केले होते.

संकर्षण सोशल मीडियामधून देखील सक्रिय असतो. सोशल मीडियातून आपल्या चाहत्यांना वेळोवेळी माहिती देत असतो. काही दिवसांपूर्वी संकर्षण याचे नाटक देखील लोकप्रिय ठरले आहे. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकामध्ये तो अतिशय जबरदस्त असे काम करताना आपल्याला दिसत आहे.

आता संकर्षण याच्या पत्नी बाबतची एक बातमी सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. संकर्षण याच्या पत्नीचे नाव शलाका पांडे असे आहे. शलाका आणि संकर्षण सोशल मीडियावर देखील आपले अनेक फोटो शेअर करत असतात. या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच दोन गोंडस मुलांना जन्म दिला आहे. संकर्षणची पत्नी शलाका पांडे ही देखील एक कलाकार आहे.

वास्तविक जीवनात ती पेंटर असून आपले अनेक पेंटिंग ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिचे कौतुक देखील अनेक जण करताना दिसत असतात. तर आपल्याला संकर्षण आवडतो का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral