नुकतीच आई झालेल्या ‘या’ अभिनेत्रीवर कोसळला ‘अडचणींचा’ डोंगर

दक्षिण चित्रपट सृष्टीमधील आघाडीचा अभिनेता व दिग्दर्शक विघ्नेश आणि त्याची पत्नी नयनतारा यांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. नयनतारा हिने बाळांना जन्म दिला आहे. मात्र, लग्नाच्या केवळ चार महिन्यानंतरच या दोघांनी आपत्य जन्माला घातले आहे.
त्यामुळेच आता याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आता या प्रकरणात एक वेगळ वळण आले असून या दोघांनी सरोगसी माध्यमातून हे आपत्य जन्माला घातल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळेच आता हे दोघे वादात अडकण्याची शक्यता आहे.
वाद म्हणजे लग्नाला चार महिने झालेले असताना त्यांनी मूल कसे जन्माला घातले, असा प्रश्न देखील अनेक जण उपस्थित करताना दिसत आहे. अलीकडेच तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एस एस सुब्रमण्यम यांनी या वृत्ताला देखील दिला आहे. त्यामुळे आता या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अलीकडे सरोगसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मूल जन्माला घालण्याचे प्रकार हे घडत असल्याचे देखील समोर आले आहे. आमिर खान, शाहरुख खान यासारख्या कलाकारांनी ही सरोगसीच्या माध्यमातूनच मुलांना जन्म दिला आहे. एकूणच काय तर आता नयनतारा आणि विघ्नेश यांच्या सरोगसी प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम एस सुब्रमण्यम यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना नयनतारा आणि विघ्नेश यांच्या सरोगसीबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यावर सुब्रमण्यम यांनी सांगितले की, सरोगसीस हाच एक वादाचा मुद्दा आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे नयनतारा आणि विघ्नेश यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. सरोगसीच हा एक वादाचा मुद्दा आहे. 21 वर्षापेक्षा जास्त आणि 36 वर्षापेक्षा कमी असलेल्या लोकांना सरोगसीच्या माध्यमातून आपत्य जन्माला घालता येते, असा हा कायदा आहे. मात्र, यामध्ये संशोधन होणे फार महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
तसेच आता वैद्यकीय सेवा संचनालय आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देणार असल्याचे देखील सुब्रमण्यम यांनी सांगितले. एकूणच काय तर आता विघ्नेश आणि नयनतारा यांच्या अडचणीत वाढ होणार असून त्यांची चौकशी होणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.