टायगरच्या या सवयीमुळे त्याचे नाव ठेवण्यात आले टायगर, खरे नाव वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

टायगरच्या या सवयीमुळे त्याचे नाव ठेवण्यात आले टायगर, खरे नाव वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

‘हिरोपंती’ या चित्रपटातून डेब्यू करणारा टायगर श्रॉफ आता बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. लाखों तरुणी त्याच्यावर फिदा आहेत. 2 मार्च रोजी टायगरचा वाढदिवस असतो आणि आपल्या सर्वांना माहितीच असेल की अभिनेता जॅकी श्रॉफचा टायगर हा मुलगा आहे.

टायगरने खूपच कमी काळात बॉलिवूडमध्ये त्याची एक ओळख निर्माण केली आहे.टायगर हा जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. पण टायगर आणि त्याच्या वडिलांची स्टाईल ही खूपच वेगळी आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या दोघांच्या अभिनयशैलीत देखील खूप फरक आहे. पण तरीही त्याच्या वडिलांइतकीच त्याला लोकप्रियता मिळाली आहे.

टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याच्या अभिनयाइतकीच त्याच्या नावाची चर्चा झाली होती. कारण त्याचे नाव खूपच वेगळे असल्याची सुरुवातीपासूनच चर्चा रंगली होती. टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. जॅकीचा लहान भाऊ जय हेमंत याच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले होते.

जॅकी श्रॉफने खूप लहान वयात या भावाला गमावले होते. त्याच्यासमोरच समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला होता. त्याचमुळे आपल्या भावाची आठवण कायम ठेवण्यासाठी आपल्या मुलाचे नाव त्याने हेमंत ठेवले होते. हेमंत हे नाव बदलून टायगर हे नाव ठेवण्यामागे एक रंजक किस्सा आहे.

टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे. होय, लहानपणी टायगरला चावायची सवय होती. तो सगळ्यांना चावत सुटायचा. तो सतत चावायचा. या सवयीसाठी त्याच्या आईने त्याला अनेकदा मारले होते. तो जसा जसा मोठा झाला, तशी तशी त्याची ही सवय अधिकच वाढत गेली.

घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही तो चावायचा. त्यामुळे जॅकी श्रॉफने त्याचे नाव टायगर असे ठेवले. टायगरची लहान बहीण कृष्णा आणि टायगरमध्ये अनेकवेळा भांडणं व्हायची. एकदा दोघांमध्ये इतके जोरदार भांडण झाले की, टायगरने कृष्णाचा चावा घेतला. हा चावा इतका भयानक होता की तिला डॉक्टरकडे न्यावे लागले.

यामुळे टायगरची आई इतकी संतापली की, तिने त्याला मिरची खायला लावली. पुढे पुढे तो जेव्हाही चावायचा ती त्याला मिरची खायला लावायची. मग मात्र टायगर घाबरू लागला आणि हळूहळू त्याची ती सवय मोडली. पण त्याचे टायगर हे नाव मात्र कायम राहिले.

Team Hou De Viral