तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवडकरचे पत्नीसोबतचे फोटो झाले व्हायरल, पत्नी आहे खूपच सुंदर

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवडकरचे पत्नीसोबतचे फोटो झाले व्हायरल, पत्नी आहे खूपच सुंदर

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे म्हणजेच मंदार चांदवडकरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गावी गेला असल्याचे त्याच्या फॅन्सना सांगितले होते. आता त्याचा आणि त्याच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मंदार आणि त्याची पत्नी मंदिरातून पाया पडून बाहेर आल्यानंतर हा फोटो काढण्यात आला आहे. त्याची पत्नी खूपच छान दिसत असल्याचे तिचे फॅन्स कमेंटद्वारे सांगत आहेत. अभिनेता मंदार चांदवडकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मंदारने त्याच्या भावाच्या शेतामध्ये हा व्हिडीओ शूट केला होता.

हा व्हिडीओ शेअर करताना मंदारने लिहिले होते की, ”मी माझ्या मूळगावी म्हणजेच नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आलोय. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे हे पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे.” तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.

या मालिकेला अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral