तोंडात दिसायला लागले असे लक्षण तर अजिबात दुर्लक्ष करू नका.. असू शकते तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण..

तोंडात दिसायला लागले असे लक्षण तर अजिबात दुर्लक्ष करू नका.. असू शकते तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण..

आजकालच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या आजारांची समस्या निर्माण झाल्याचे आपण पाहिले असेल. अनेक तरुणांना गुटखा, सिगरेट, तंबाखू हे यासारख्या सवयी आहेत. त्यामुळे तोंडातले येणे किंवा तोंडात फोड येणे या इतर आजारांची समस्या त्यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे. यातून मोठे आजार देखील उद्भवू शकतात. अनेक तरुणांना तोंडात फोड येतात आणि लवकर निघून जातात.

मात्र, काही तरुणांना तोंडात फोड आल्यानंतर ते निघून जातच नाहीत. मात्र, ते अंगावर काढतात. त्यानंतर हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार करावे लागतात. नाही तर प्रकरण खूप मोठे वाढीस लागते. तोंडातील कॅन्सर देखील होऊ शकतो. चला तर मग या लेखामध्ये आपण जाणून घेऊया कॅन्सरचे काय लक्षण असतात आणि त्यावर काय उपाय करावेत.

1) जर आपल्या तोंडातून फोड येत असतील तर आपण याकडे दुर्लक्ष करू नका. कारण की हा कॅन्सरसारखा आजार असू शकतो. तोंडामध्ये पांढरे चट्टे येत असले तरी आपण दुर्लक्ष करू नका. हा देखील कॅन्सर सदृश्य आजार असू शकतो.

2) जर आपल्या तोंडाचा कायमच वास येत असेल तर आपण याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. ताबडतोब डॉक्टरांनी दाखवा. अनेकदा तोंडाचा वास येणे हे गंभीर आजाराचे लक्षण असते. आपल्याला कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. तसेच आवाजा मधून बदल येत असेल तरी आपण तरी डॉक्टरांना दाखवा.

3) जर आपल्या तोंडातून अधिक प्रमाणात लाळ वाहत असेल तर आपण तातडीने डॉक्टरांना दाखवावे. लाळ वाहणे हे चांगले नसते. लाळ वाहने म्हणजे आपल्याला गंभीर आजार असल्याचे लक्षण आहे.

4) ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा लोकांना हा आजार लवकर होऊ शकतो. त्यामुळे आपण सकस आहार घेऊन यावर मात केली पाहिजे.

5) भविष्यामध्ये आपल्याला हा आजार जडू नये यासाठी आपण गुटखा, बिडी, तंबाखू, सिगारेट अजिबात खाल्ली नाही पाहिजे. यामुळे आपल्याला कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींपासून आपण दूर राहिले पाहिजे. कधीही याचे सेवन करू नये.

6) तोंड व्यवस्थित स्वच्छ करा : जर आपण तोंड व्यवस्थित धुत नसेल तर आपल्याला कॅन्सर सारख्या आजाराने बळी पडावे लागू शकते. हा आजार जीवघेणा देखील होऊ शकतो. त्यामुळे यावर आपण तातडीने उपाय करून मात केली पाहिजे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral