सारखं तोंड येतंय? ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा

सारखं तोंड येतंय? ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा

तोंड आले की काही सुचेनासे होते. खाणं तर दूरच पण पाणी पिणंही कठीण होते. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्याचे सेवन, यामुळे तोंड येते. तोंड येणे ही साधारण बाब झाली आहे. त्यामुळे त्याची काही मुख्य कारणे जाणून घेऊन त्यावर काही घरगुती उपाययोजना केल्यात तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल.

सतत तोंड येण्याची ही आहेत मुख्य कारणे –

१. जास्त मसालेदार पदार्थ खाणे.
२. जास्त गरम पदार्थ किंवा दारूचे सेवन करणे.

३. दातांची हवी तशी योग्य निगा न राखणे.
४. जास्त प्रमाणात एसिडिक पदार्थांचे सेवन करणे.

५. शरीरात व्हिटॅमिन बी व आर्यनचे संतुलन नसणे.
६. एलर्जी असलेले पदार्थाचे सेवन करणे.
७. आजारी असतानाही बऱ्याच जणांना तोंड येते.

तोंड आल्यावर हे घरगुती उपाय करा –

१. एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.

२. तुळसीच्या दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या.
३. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा.

४. खाण्याच्या पानाचे चूर्ण तयार करुन त्यात थोडा मध मिसळा. हे चाटण लावल्याने फोड लवकर बरे होतात.
५. लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.

६. सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खा.
७. भरपूर पाणी प्या. यामुळे पोट साफ होऊन तोंडाला आराम मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral