तुमच्याही तोंडाची दुर्गंधी येते त्यामागे असू शकतात ही कारणे, त्यावर करा हे घरगुती उपाय

बऱ्याचदा संवाद साधताना समोरच्याच्या तोंडातून एक तीव्र दर्प आपल्या श्वासांना भिडतो आणि शिसारी येते. अशा वेळी सर्वांसमोर आपण त्याला तोंडाची दुर्गंधी येत असल्याचे सांगू शकत नाही. कधीकधी यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपली वाईट छाप उमटते.मात्र श्वासांच्या दुर्गंधीची फक्त अपचन किंवा कांदा खाणे हीच नाही तर अनेक कारणे असू शकतात.
1. पचन क्रियेत बिघाड. 2. दात कुजणे
3. पोटात काही गडबड होणे. 4 हिरड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणे
अशी बरीच कारणे यामागे असू शकतात. मात्र योग्य आहार काही घरगुती उपाय केल्यास यापासून तुमची सुटका होऊ शकते. जाणून घेऊया…
1. पाणी – योग्य प्रमाणात आणि वेळेत पाणी प्यायल्याने तोंडाची स्वच्छता होण्यास मदत होते. तसेच पाणी क्लींजरचे का करते आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. दिवसभर आपण काही ना काही खात असतो आणि यामुळे तोंडातील बॅक्टेरिया दात आणि हिरड्यांना टार्गेट करतात.
2. संत्री, लिंबू, दही – संत्री, लिंबू आणि दही यात सी व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असते. याच्या सेवनाने फक्त प्रतिकारशक्ती आणि चेहऱ्यावरील तेज वाढत नाही तर, श्वासांच्या घाण दर्पापासून सुटका होऊ शकते.
3. बडीशेप – जेवण झाल्यावर बडीशेप खाण्याचा फायदा आहे. यामुळे जेवणाचे पचन तर होतेच शिवाय श्वासांची दुर्गंधी घालवण्यासाठी ही उपयोगी आहे.
4. लवंग आणि वेलची – लवंग आणि वेलची (वेलदोडा) यामुळे देखील तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत मिळते. वेलदोडामध्ये अँटीसेप्टिक असल्याने व हळूहळू चावून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते. तर भाजलेली किंवा कच्ची लवंग खाल्ली तरी त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.
5. दालचीनी – दालचीनीच्या गोड चवीमुळे भाजी, मसाले, काढा यांना तर चव मिळतेच, शिवाय यात असणाऱ्या अँटीसेप्टिक गुणामुळे तोंडात उत्पन्न होणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि श्वासांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.