एकाच मालिकेत काम करणारे हे कलाकार पडले एकमेकांच्या प्रेमात

एकाच मालिकेत काम करणारे हे कलाकार पडले एकमेकांच्या प्रेमात

बिग बॉस म्हटलं की यामध्ये वाद विवाद, टास्क आणि प्रेम प्रकरण यामध्ये काही नवीन नाही. याआधी देखील आपण अनेकदा असे प्रकरण पाहिलेले आहेत. बिग बॉसच्या हिंदी सेशनमध्ये आपण प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिची बहीण तनिषा आणि आरमान कोहली यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाल्याचे आपण पाहिले होते.

बिग बॉसच्या घरामध्ये त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. मात्र, या प्रेम संबंधांना अजय देवगन याचा विरोध होता. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतरही तनिषा आणि आरमान कोहली यांच्यामध्ये प्रेम संबंध सुरू होते. नंतर कालांतराने या दोघांच नाते संपुष्टात आले. त्याचबरोबर मराठी बिग बॉस मध्ये रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यामध्येही प्रेम संबंध निर्माण झाले होते.

त्याआधी रेशम टिपणीस हिने आपल्या पतीला घटस्फोट दिल्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरणही संपुष्टात आले होते. आता कलर्स मराठी वर सुरू असलेल्या बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये देखील असेच काहीसे प्रकरण समोर आलेले आहे.

एक अभिनेता आणि एक अभिनेत्री एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे सर्वत्र सांगण्यात येत आहे. या दोघांनीही तशी कबुली दिली आहे, असेच म्हणावे लागेल. बिग बॉस महेश मांजरेकर यांनी देखील या अभिनेत्याला एकदा विचारणा केली की, तुला गर्लफ्रेंड भेटली की नाही. त्यानंतर त्रिशूल याने जरा लाजुनच उत्तर दिले होते.

बिग बॉस मधून नुकतीच एका स्पर्धकाची घरवापसी झाली आहे. निखिल राज शिर्के असे त्याचे नाव आहे. निखिल राज शिर्के आता या शोच्या घराच्या बाहेर पडला आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात कोणाचा नंबर लागतो हे पाहणे देखील फार मजेशीर ठरणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सध्या निखिल राज शिर्के बाहेर पडल्यानंतर किरण माने, तेजश्री लोणारे, यशश्री मसुरेकर, समृद्धी जाधव, योगेश, त्रिशूल, विकास सावंत यांच्यासह अपूर्वा नेमळेकर, अमृता देशमुख हे कलाकार देखील सहभागी आहेत.

आता काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्रिशूल आणि समृद्धी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात येते. बिग बॉस महेश मांजरेकर यांनी देखील त्रिशूल याला विचारले होते की, तुला गर्लफ्रेंड भेटली की नाही. त्यावर त्याने उत्तर दिले होते. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्रिशूल आणि समृद्धी एकमेकांशी भांडणे करताना दिसत आहेत.

त्रिशूल समृद्धीला म्हणत आहे की, तुझा बेस्ट फ्रेंड दुसरा आहे ना. त्यावर समृद्धी म्हणत आहे असे काही नाही. तूच माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्यावर त्रिशूल म्हणताना दिसत आहे की, मग माझ्याशी भांडताना रडत जाऊ नको. प्रेमाने भांडत जा, असे म्हणत आहे. त्यामुळे आता या दोघांचे प्रेम संबंध पुढे सरकतात की, मध्ये संपुष्टात येतात हे पाहावे लागेल.

Team Hou De Viral