मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्रीचा मुलगा आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील रॉकी

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्रीचा मुलगा आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील रॉकी

सध्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. काही भागांमध्ये मजेशीर प्रसंग घडले ते आपण पाहिले आहेत.

एका भागामध्ये मोहित हा चान्या याच्यावर एक भयंकर प्रसंग करतो. हा प्रसंग म्हणजे चन्य हा ज्यावेळेस बसमध्ये चढत असतो, त्यावेळेस पाठीमागून मोहित येतो आणि त्याला सुई टोचवतो. त्यामुळे तो ओरडून खाली पडतो. त्यानंतर लोक त्याला उचलतात, असा हा प्रसंग होता. मात्र, हा प्रसंग मालिकेत दाखवल्याने आणि प्रेक्षकांनी यावर टीकादेखील केलेली आहे.

कारण आता कोरोना महामारीचा काळ संपलेला आहे आणि आता लोकल देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. उद्या कोणी जर असा प्रसंग रेल्वेमध्ये कोणासोबत केला तर काय करावे असा त्यांनी सवाल केला आहे. आणि आपल्या मालिकेमुळे याला प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या मालिकेच्या लेखकावर ही त्यांनी टीका केली आहे.

त्यामुळे मालिका खूप ट्रोल झाल्याचेही पाहायला मिळाले. या मालिकेमध्ये मोहित आणि मालविका हे स्वीटूच्या कुटुंबियांना त्रास देण्याचे काही थांबवत नाहीत. या मालिकेत काही महिन्यांपूर्वीच मनमीत पेम याची एन्ट्री झालेली आहे. मनमीत याने देखील या मालिकेत अतिशय चांगला अभिनय केलेला आहे.

आज आम्ही आपल्याला या मालिकेतील एका अशा कलाकाराबद्दल माहिती देणार आहोत की तो सगळ्यांमध्ये खूप लोकप्रिय झालेला आहे. या मालिकेत त्याने रॉकीची भूमिका साकारलेली आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली आहे. याआधी देखील अनेक असे कलाकार आहेत की, ज्यांना अभिनयाचा वारसा खूप मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे.

आपल्याला उदाहरण द्यायचे झाले तर आपण विराजस कुलकर्णी याचे घेऊ शकतो. विरजास कुलकर्णी याची आई मृणाल कुलकर्णी या दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकामध्ये देखील काम केले आहे. काही बॉलीवूड चित्रपटातही त्यांनी आपला डंका वाजवलेला आहे, तर रॉकी याचे खरे नाव त्रीयुग मंत्री असे आहे.

त्रीयुग यालादेखील अभिनयाचा वारसा खूप मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे, त्याचे आई-वडील देखील अभिनेता व अभिनेत्री होते. त्रीयुग याच्या आईचे नाव सुलभा मंत्री असे होते, सुलभा मंत्री यांनी अनेक चित्रपटात काम केलेले आहे. त्यांनी काम केलेला चोरबाजार, टपाल, धुमशान, पूर्ण सत्य हे चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात गाजलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी ‘आमची माती आमची माणसं’ या सह्याद्री वरील मालिकेत देखील काम केलेले आहे.

त्याचबरोबर त्यांनी साराभाई साराभाई या मालिकेतही काम केलेले आहे, तर त्याच्या वडिलांचे नाव नितीन मंत्री असे आहे. नितीन मंत्री हे दिग्गज असे कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलेले आहे. याबाबत त्रियुग म्हणतो कि, मला माझ्या आईवडिलांनी चांगले शिक्षण दिले. त्यानंतर चांगली शिकवण देखील दिली. त्यामुळेच मी आज हे यश मिळाले आहे.

याआधी त्रीयुग याने महाराणा प्रताप, विघ्नहर्ता गणेश, सीआयडी यासारख्या हिंदी मालिका देखील काम केलेले आहे. आपल्याला त्रीयुग मंत्री आवडतो का? ते आम्हाला नक्की सांगा.

Ambadas