‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ची हवा ! अरुंधती-दीपाला गौरीची धोबीपछाड; बघा या आठवड्याचा TRP चार्ट

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ची हवा ! अरुंधती-दीपाला गौरीची धोबीपछाड; बघा या आठवड्याचा TRP चार्ट

दीड ते दोन वर्षांपूर्वी टीआरपीचा मोठा घोटाळा झाला होता. त्यामुळे टीआरपी बंद करण्यात आले होते. मात्र, टीआरपी आता गेल्या काही दिवसापासून टीआरपी सुरू झाले आहेत. एखाद्या मालिकेसाठी किंवा एखाद्या चॅनलसाठी टीआरपी हे खूप महत्त्वाचे असतात. या माध्यमातूनच किती प्रेक्षक आपल्या मालिकेपर्यंत पोहोचले आहेत.

किती जण आपल्या मालिका पाहतात, हे आपल्याला सर्व काही कळत असतं. आता गेल्या काही दिवसापासून अनेक मालिका या खाली वर झालेल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय झाली होती. मात्र आता या मालिकेचा दर्जा घसरला आहे. आज आम्ही आपल्याला मालिकांच्या टीआरपी बाबत माहिती देणार आहोत.

10. शंतनू आणि पल्लवी यांची स्वाभिमानची कहाणी काही प्रेक्षकांना सध्या आवडत नसल्याचे दिसत आहे. ही मालिका आता पार घसरली असून या मालिकेला 4.4 रेटिंग मिळाले असून ही मालिका दहाव्या क्रमांकावर गेली आहे.

9. तर आता या आठवड्यामध्ये नवव्या क्रमांकावर फुलाला सुगंध मातीचा ही मालिका पोहोचली आहे. या मालिकेला 4.9 ची रेटिंग मिळाली आहे. शुभम आणि कीर्ती यांची लोकप्रियता आता घटत आहे.

8. झी मराठीवर मोठा थाटामाटात सुरू झालेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता पार घसरली असून या मालिकेला दहावा क्रमांक मिळाला आहे. 5.3 रेटिंग सह आठव्या स्थानावर आली आहे.

7. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका देखील या आठवड्यात 5.6 रेटिंग सह सातव्या क्रमांकावर पोचली आहे. अप्पू आणि शशांक यांची धमाल आता या मालिकेत पाहायला प्रेक्षकांना आवडत नाही की काय असा देखील प्रश्न विचारला जात आहे.

6. रंग माझा वेगळा या मालिकेचा दर्जा देखील आता घसरला असून ही मालिका 5.7 टीआरपी रेटिंग सह सहाव्या क्रमांकावर पोचली आहे. दीपा आणि कार्तिक यांच्यातील नाते आता प्रेक्षकांना आवडत नाही, असे देखील सांगण्यात येते.

5. गेल्या काही आठवड्यात सुरू झालेली तुझेच मी गीत गात आहे ही मालिका आता पाचव्या क्रमांकावर आली असून या मालिकेला 5.6 ची टीआरपी रेटिंग मिळाली असून स्वराचा स्वराज झाल्यानंतर या मालिकेला आता वेगळ वळण मिळत आहे.

4. स्टार प्रवाह वरील सर्वच मालिका आता एकमेकांच्या शर्यत करताना दिसत आहेत. कीर्ती आणि शुभम यांचा बदललेला लुक प्रेक्षकांना आवडत आहे. 6.1 सह रेटिंग सह ही मालिका आता चौथ्या क्रमांकावर आली आहे.

3. तर गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेली आई कुठे काय करते ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आली असून या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.

2. गेल्या दोन महिन्यापासून पहिल्या क्रमांकावर असलेली रंग माझा ही वेगळा ही मालिका आता टीआरपीच्या बाबतीत खाली घसरली असून या आठवड्यात 6.6 टीआरपी रेटिंग या मालिकेला मिळाले आहे.

1. तर स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने या आठवड्यात सगळ्यांनाच मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाला आहे.

या रेटिंगमध्ये काही मालिका या दोनदा स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना दहा मध्ये देखील स्थान मिळाले आहे.

Team Hou De Viral