आजवर कधीही न रडलेल्या तृप्ती देसाई ‘बिगबॉस’ च्या घरात ढसाढसा रडल्या, नेमकं काय झालंय बिगबॉसच्या घरात

आजवर कधीही न रडलेल्या तृप्ती देसाई ‘बिगबॉस’ च्या घरात ढसाढसा रडल्या, नेमकं काय झालंय बिगबॉसच्या घरात

मराठी बिग बॉस शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये अभिनय क्षेत्रातील स्पर्धेत हे थोडे अधिक प्रमाणात आहेत. तरी देखील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे स्पर्धक काही यामध्ये सहभागी झाले आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर 19 सप्टेंबरपासून मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व सुरू झाले आहे.

या शोमध्ये भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यादेखील सहभागी झालेल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी आजवर अनेक आंदोलने करून महिलांसाठी कार्य केलेले आहे. त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये महिलांना प्रवेश द्यावा यासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले होते. त्याचबरोबर शनिशिंगणापूर येथील मंदिरात देखील महिलांना प्रवेश देण्याची मागणी त्यांनी केली होती.

या वेळी मात्र प्रचंड वाद निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, त्यांना गावाच्या बाहेरून परत यावे लागले होते. त्याचप्रमाणे मुंबईतील हाजी अली दर्ग्यात देखील त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, येथे एक मोठा जमाव जमला. त्यामुळे त्यांना परत जावे लागले होते.

आजवर तृप्ती देसाई यांनी खूप आंदोलने केलेली आहेत. महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित एका बँकेचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळी सध्या खूप चर्चेत आल्या होत्या. मराठी बिग बॉसमध्ये कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील ही देखील सहभागी झाली होती.

मात्र, काही दिवसानंतर ती आजारी पडली. त्यानंतर बिग बॉस म्हणजे महेश मांजरेकर यांनी त्याला उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तिने उपचार देखील घेतले. मात्र, तरीदेखील तिची प्रकृती ठीक होत नसल्याने तिने या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

शिवलीला हिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला, असे आता सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. कारण की वारकरी संप्रदायातील आजवर कोणीही अशा शोमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यामुळे तिच्यावर टीकेचा भडिमार करण्यात येत होता. बिग बॉसमध्ये सध्या वेगवेगळे नाट्य घडताना दिसत आहेत.

कॅप्टेन्सी जिंकण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. बिग बॉसच्या घरामध्ये तृप्ती देसाई यांनी अजून तरी कुठलाही वादाचा प्रसंग केला नाही, असे दिसत आहे. त्यामुळे त्या अजून काही काळ या घरात राहण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी त्यांचा मुलगा योगिराज याचा वाढदिवस होता.

त्यावेळेस त्यांना रडू कोसळले आणि घरातील सदस्यांनी देखील त्यांना मोठा आधार दिला. मुलाशी संवाद साधल्यानंतर तृप्ती देसाई यांना रडू कोसळले. तृप्ती देसाई म्हणाल्या की, बारा वर्षांमध्ये मी त्याला कधीही एकटे सोडले नाही. त्याचा वाढदिवस कधीही असा झाला नाही. मात्र, यावेळेस त्याला सोडून मला त्याचा वाढदिवस साजरा करावा लागत आहे.

यावेळेस तृप्ती देसाई यांना मीनल शहा म्हणाली की, आई आहेस तू, मी समजू शकते. त्यावर दादुस याने देखील तिची समजूत काढली, तर आदीश याने तृप्ती देसाईचे अश्रू पुसले. त्याचबरोबर एक स्पर्धक म्हणाला की, आजवर तुला रडताना कधी पाहिलं नव्हतं. मात्र, खूप खूप स्ट्रॉंग वुमन आहेस, असे तो म्हणाला.

Team Hou De Viral