‘तू तेव्हा तशी’ मधला खाजगी सीन पाहून प्रेक्षक भडकले, ‘लाजा आहेत का नाही तुम्हाला.. ‘

‘तू तेव्हा तशी’ मधला खाजगी सीन पाहून प्रेक्षक भडकले, ‘लाजा आहेत का नाही तुम्हाला.. ‘

“तू तेव्हा तशी” ही मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला अतिशय वेगळे वळण आल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये सौरभ, अनामिका हे आता एकत्र जवळ आल्याचे पाहायला मिळत आहेत. या दोघांच्या नात्यांमधील कटूता आता संपली आहे.

या मालिकेमध्ये मध्यंतरी अनामिका हिच्या पहिल्या पतीची एन्ट्री झाली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. या मालिकेत अनामिका हिच्या पहिल्या पतीची भूमिका अभिनेता अशोक समर्थ याने साकारली होती. तो गालातल्या गालातच काय बोलतो, असे म्हणून त्याच्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. या मालिकेमध्ये सौरभच्या भूमिकेत आपल्याला अभिनेता स्वप्नील जोशी हा दिसला आहे.

तर अनामिकेच्या भूमिकेमध्ये आपल्याला अभिनेत्री शिल्पा तुळसकर ही दिसली आहे. या मालिकेमध्ये दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली असली तरी या आधी या दोघांनी दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी मायलेकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता हे दोघे रोमान्स करताना दिसत आहेत. आता तू तेव्हा तशी या मालिकेतला एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अनामिका आणि सौरभ हे इंटिमेट झाल्याचे दाखवण्यात येत आहे. बेडवर हा सीन चित्रित करण्यात आला आहे. दोघांच्या नात्यात दुरावा संपल्याने आता ते एकत्र आले आहेत. बेड वरील सीनमध्ये स्वप्निल म्हणजे सौरभ हा अनामिका हिच्या हाताला किस करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा हा रोमँटिक सीन प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

अनेकांनी या सीनवर टीका देखील केली आहे. अनेक जण हे घरात बसून कुटुंबासोबत मालिका पाहत असतात. त्यामुळे अशा प्रकारचा सीन या मालिकेत दाखवणे अतिशय चुकीचे आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. त्याचबरोबर बंद करा ही मालिका असे देखील अनेक प्रेक्षकांनी म्हटले आहे, तर आपले या सीनबद्दल काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral