‘हिला बाहेर काढा रे…’, ‘तू तेव्हा तशी’ मालिकेवर प्रेक्षक भडकले

‘हिला बाहेर काढा रे…’, ‘तू तेव्हा तशी’ मालिकेवर प्रेक्षक भडकले

सध्या छोट्या पडद्यावर तू तेव्हा तशी ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

मालिकेत सध्या रंजक घटना-घडामोडी पाहताना मिळत आहेत. दोघेही अतिशय जबरदस्त असे कलाकार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीत तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्या दोघांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम करून आपल्या अभिनयाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे.

शिल्पा तुळसकरने शांती या मालिकेतही काही वर्षांपूर्वी काम केले होते. दूरदर्शनवर काम करणारी शिल्पा तुळसकर ही त्या काळातील ए़खाद दुसरी अभिनेत्री म्हणावी लागेल. शिल्पा तुळसकर हिने या आधी देखील अनेक मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे, तर स्वप्निल जोशी याने देखील श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.

तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये स्वप्नील जोशी याने सौरभ विष्णुपंत पटवर्धन ही भूमिका साकारली आहे, तर शिल्पा तुळसकर हिने या मालिकेमध्ये अनामिका दीक्षित ही भूमिका साकारली आहे. या दोघांची भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेमध्ये अभिंज्ञा भावे हीने देखील काम केले आहे.

आता ही दिवसेंदिवस मालिका लोकप्रिय होत असताना त्या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सौरभ आणि अनामिका यांच्यामध्ये जवळीक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दोघेही एकमेकांना खूप आवडत आहेत.

मात्र, अशामध्येच या मालिकेला आता कुणाची नजर लागणार का? असे चित्र निर्माण झालेले आहे. कारण की या मालिकेमध्ये आता अनामिकेकची आई कावेरी हिची एन्ट्री झाली आहे. कावेरी या आता आपल्या मुलीच्या बाबतीत ढवळाढवळ करताना दिसत आहेत.

नुकत्याच झालेल्या एका सीन मध्ये स्वप्निल म्हणजेच सौरभ याला भेटून अनामिका ही घरी येते, तर कावेरी गोमूत्राची बाटली तिच्या अंगावर शिंपडते. त्यानंतर प्रेक्षकांचा हा सीन पाहून संताप झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी यावर टीका केली आहे आणि सांगितले आहे की, एखादी आई आपल्या मुलीसोबत असे कसे वागू शकते. बंद करा ही मालिका.

इतकी विचित्र आई कशी काय असू शकते, असा प्रश्न पडला आहे, तर काही जणांनी याचे समर्थन देखील केले आहे. तर तुम्ही ही मालिका पाहता का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral