‘तुमच्यामुळे पिढी व समाज नासलाय’, बंद करा ही मालिका नाही तर.. या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले

‘तुमच्यामुळे पिढी व समाज नासलाय’, बंद करा ही मालिका नाही तर.. या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका या सुरू आहेत. यामध्ये आपल्याला आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार यासारख्या मालिका पाहायला मिळत आहेत, तर तू तेव्हा तशी ही मालिका देखील सध्या प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे.

या मालिकेला टीआरपी सध्या चांगल्या प्रमाणात मिळत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला बऱ्याच दिवसानंतर शिल्पा तुळसकर आणि स्वप्निल जोशी यांची जोडी पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या एका मालिकेमध्ये स्वप्निल जोशी याने काम केले होते. या मालिकेमध्ये त्यांनी मायलेकाची भूमिका केली होती.

मात्र, आता चक्क वीस वर्षानंतर हे दोघे प्रियकर आणि प्रियसीच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यानंतरही प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारले आहे. मालिकेचे कथानक खूप चांगले आहे. मात्र, मालिकेमध्ये आता आकाश याची एन्ट्री झाली आहे त्यामुळे प्रेक्षक हे प्रचंड संतापलेले पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध अभिनेत्याने देखील याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

मालिकेमध्ये काम करणारा आकाश हा काय बोलतो, कळतच नाही. तो बोलत असताना त्याच्या खाली सब टायटल द्यावे, असे त्याने म्हटले होते. या मालिकेमध्ये आकाश ही भूमिका अभिनेता अशोक समर्थ हा करत आहे. अशोक समर्थ हा अतिशय जबरदस्त अभिनेता आहे. मात्र, तो नेमकं काय बोलतो तेच कळत नाही. तर या मालिकेमध्ये शिल्पा तुळसकर यांनी देखील अनेक वर्षानंतर काम केले आहे.

शिल्पा तुळसकर या अतिशय ज्येष्ठ अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी याआधी मालिका, चित्रपट, नाटक या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटला आहे, तर स्वप्निल जोशी हा देखील एक दिग्गज अभिनेता आहे. स्वप्निल जोशी याने या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त रित्या काम केले आहे. स्वप्निल जोशी हा आपल्याला गेला 25 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

स्वप्निल जोशी याने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आजही तो चॉकलेट बॉय म्हणूनच मराठी चित्रपट सृष्टी मध्ये प्रसिद्ध आहे. आता या मालिकेमध्ये आकाश याची एंट्री झाली आहे. आकाश हा अनामिका हिला प्रचंड त्रास देत आहे. त्यामुळेच प्रेक्षक या मालिकेवर संतापले आहेत.

सर्व काही सुरळीत सुरू असताना या आकाश एंट्री मालक मालिकेत दाखवणे गरजेचे होते का? असे अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही मालिका बंद करा नाहीतर ते आकाशला तरी मालिकेच्या बाहेर काढा, असे प्रेक्षकांनी म्हटले आहे तर आपल्याला तू तेव्हा तशी ही मालिका आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral