असा होणार ‘तुझेच गीत मी गात आहे’ या मालिकेचा शेवट

असा होणार ‘तुझेच गीत मी गात आहे’ या मालिकेचा शेवट

‘तुझेच गीत मी गात आहे’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर सुरू आहे. या मालिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सध्यातरी दिसत आहे. या मालिकेमध्ये अभिजीत खांडकेकर याने मल्हार ही भूमिका साकारली आहे.

आपल्याला उर्मिला कोठारे कानिटकर ही देखील यात दिसली होती. मात्र तिचा या मालिकेमध्ये मध्येच मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेचा शेवट कशा पद्धतीने होणार आहे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

तुझेच गीत मी गात आहे ही मालिका सध्या प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेचा शेवट नेमका कसा होणार आहे. याबाबत आम्ही आपल्याला या लेखांमध्ये माहिती देणार आहोत. या मालिकेमध्ये आता येणाऱ्या पुढील भागात स्वरा ही स्वराज बनून शहरात येणार आहे. स्वराज याची मल्हार याच्यासोबत भेट होणार आहे.

स्वराज याचा आवाज चांगला असतो, म्हणून स्वार्थापोटी मोनिका ही त्याला आपल्या घरात राहायला जागा देते. याचे कारण म्हणजे मोनिका हिला स्वराज याचा आवाज वापरून पिहूचे करियर घडवायचे असते. त्यानंतर मल्हार हा सुद्धा पिहू आणि स्वराज यांना गाणे शिकवतो. पुढे या मालिकेमध्ये स्वराज हा स्वराज नसून स्वरा आहे आणि ती मल्हार याची मुलगी आहे हे मोनिकाला समजेल.

त्यानंतर पुढे मोनिका ही तिच्या पहिल्या नवऱ्याला फसवून स्वराजला दत्तक घेण्यास भाग पाडेल. त्यानंतर या मालिकेमध्ये मोनिका हिचा भाऊ हा स्वराज याला विश्वासात घेऊन मल्हार हा तिचा बाप आहे हे सांगेल. त्यानंतर मोनिकाला हे सगळं काही खटकत असते. त्यामुळे मोनिका ही आपली मुलगी पिऊ हिला मुद्दाम विषबाधा करून स्वराज याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवायला लावेल.

काही दिवसानंतर मल्हार याला कळेल की, स्वराज हा मुलगा नसून स्वरा आहे आणि त्याची ती मुलगी आहे. मात्र मोनिका आणि पिहू यांना मल्हार यांनी प्रॉमिस केल्याने तो स्वराला परत आणत नाही. मात्र हे सर्व काही कळताच स्वरा हिला खूप मोठा धक्का बसतो. मल्हार याला सुद्धा त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप होता. त्यानंतर पुढे स्वरा ही गाण्याची स्पर्धा जिंकून पिऊ हिला हारवेल.

त्यानंतर या मालिकेमध्ये पुढे मल्हार याचा अपघात होईल आणि त्याची स्मरणशक्ती पूर्णतः जाईल. उपचार घेतल्यानंतर मल्हार याची स्मरणशक्ती परत येते आणि त्याला स्वरा ही त्याची मुलगी आहे, हे आठवते. तसेच डॉक्टरांच्या अहवालानंतर मल्हार याला कळतं की तो लवकरच या जगाचा निरोप घेणार आहे. मोनिका हिला स्वरा हिचा बदला घ्यायचा असतो.

त्यामुळे ती पिहू हिला तिच्या विरोधात भडकवते. पुढे मोनिका एका मित्राच्या मदतीने स्वरा हिने आजवर केलेले सर्व गुपित बाहेर काढेल. स्वरा ही त्यानंतर आपले बाबा मल्हार याच्यासोबत गाण्याचा रियाज करेल. मल्हार याचे आयुष्यातील काही दिवस शिल्लक राहिल्याने तो आपल्या मुली पिहू आणि स्वरा यांच्या सोबत उर्वरित दिवस घालवेल.

आणि त्यानंतर एका घटनेमध्ये या मालिकेचा शेवट दाखवण्यात आला आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका एका बंगाली मालिकेवर आधारित आहे असे सांगितले.

Team Hou De Viral