तुळशीचे पाने दुधात घालून पिल्याने हे 5 आजार पळतील दूर.. जाणून घ्या कोणते ते..

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला हे फार मोठे महत्त्व आहे. प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच असते. तुळशीचे मोठे आयुर्वेदिक गुणधर्म देखील आहे. तुळशीमुळे फार मोठे फायदे होतात.तुळस ही बहुगुणकारी आहे. तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असते. त्यामुळे आपल्या घरातील वातावरणामध्ये ऑक्सिजन मध्ये वाढ होते.
तसेच तुळशीचा वापर अनेक असाध्य रोगांवर देखील करण्यात येतो. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज तुळस आणि दूध एकत्र घेतल्याने होणारे फायदे सांगणार आहोत. दुधामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. दूध आणि तुळस एकत्र आल्याने त्याचे हात चमत्कारिक फायदे होतात. अनेक आजारावर या माध्यमातून मात करता येते.
1) दमा : सध्याच्या जमान्यामध्ये अनेक तरुणांना दम्याची लागण झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेकांना दम्याचा त्रास असतो. तसेच त्यांना अस्थमा असतो. त्यामुळे दमा किंवा अस्थमा असेल तर अशा लोकांनी दूध आणि तुळशीचे पाने एकत्र करुन याचे मिश्रण घेतले पाहिजे. यामुळे आपल्याला दम्याचा त्रास हा काही प्रमाणात कमी होतो.
2) मायग्रेन : अनेक लोकांना मायग्रेन म्हणजे अर्धशिशीचा त्रास हा फार मोठ्या प्रमाणात असतो. अनेक उपाय करून देखील मायग्रेनचा त्रास कमी होत नाही. अनेक. जण औषधे घेतात. मात्र, त्यांना काहीही फरक पडत नाही. अशा लोकांनी दुधामध्ये तुळशीचे पाणी टाकून घ्यावे. यामुळे आपल्या मायग्रेनचा त्रास हा निश्चित प्रमाणातच कमी होईल.
3) तणाव : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक जणांना तणावाची समस्या निर्माण झालेली असते. पण अनेक डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेतो. मात्र, काही केल्या कमी होत नाही. अशा लोकांनी घरगुती उपाय करून देखील हा त्रास दूर करता येऊ शकतो. गरम दुधामध्ये तुळशी पाने टाकून प्यावे, असे केल्याने तणाव दूर होतो.
4) हृदयरोग : अनेकांना हृदयरोगाची समस्या असते. अशा लोकांनी दूध आणि तुळस एकत्र करून घ्यावे. यामुळे ह्रदय रोगाची समस्या ही काही प्रमाणात दूर होऊ शकते. मात्र, असे करताना डॉक्टरांचा सल्ला देखील जरूर घ्यावा.
5) रोगप्रतिकारशक्ती : तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. तसेच तुळशीमध्ये ऑक्सिजन देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुळशीचे रोज पाने खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवू शकते. तसेच तुळस आणि दुधाचे मिश्रण एकत्रित घेतल्याने आपली प्रतिकार क्षमता ही दुपटीने वाढेल.
असे घ्या दूध आणि तुळशीचे मिश्रण : एका पातेल्यामध्ये दुध गरम करायला ठेवावे. दीड ग्लास दूध घ्यावे. त्यामध्ये तुळशीचे आठ ते दहा पाने टाकून उकळावे. हे मिश्रण एक ग्लासपर्यंत आणावे आणि असे मिश्रण घ्यावे. असे आठवडाभर करावे. याचा आपल्याला चांगला फायदा होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.