“तुमच्या बापाचं खातो का?” सामानाची तोडफोड, स्पर्धकांच्या अंगावर धावून गेला योगेश जाधव, नेमकं काय घडलं?

“तुमच्या बापाचं खातो का?” सामानाची तोडफोड, स्पर्धकांच्या अंगावर धावून गेला योगेश जाधव, नेमकं काय घडलं?

कलर्स मराठी या वाहिनीवर 2 ऑक्टोबर पासून मराठी बिग बॉस हा शो सुरु झाला आहे. यामध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे सहभागी झालेले सगळे स्पर्धक हे बॉलीवूड किंवा मराठी चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत.

या शोमध्ये आपल्याला योगेश जाधव हा देखील सहभागी झाल्याची दिसत आहे. योगेश जाधव याच्या बाबतीतला एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अतिशय शांत आणि संयमी दिसणारा योगेश हा मात्र या व्हिडिओमध्ये खूपच भडकल्याचे दिसत आहे.

बिग बॉसचे घर म्हटले की यामध्ये भांडण, मारामाऱ्या, राग, लोभ, मस्ती हे सर्व काही गोष्टी येतात. बिग बॉस हा शो हिंदी बिग बॉस धरतीवर मराठीत देखील सुरू करण्यात आला आहे. या शोच्या आत्तापर्यंत चार सत्र झालेले आहेत. या चारही सत्रांमध्ये दिग्गज अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर हे शोचे सूत्रसंचालन करत असतात.

मध्यंतरी बिग बॉसच्या चौथ्या सत्राचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर हे करणार नाहीत, असे सांगण्यात येत होते. मात्र, असे काही झाले नाही. महेश मांजरेकर हेच या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये आपल्याला अनेक अभिनेता आणि अभिनेत्री सहभागी झालेले दिसत आहेत.

यामध्ये रात्रीस खेळ चाले फेम अपूर्वा नेमळेकर, मुलगी झाली हो मालिकेतील वादग्रस्त अभिनेत्री किरण माने, यशश्री मसुरेकर, अमृता देशमुख, समृद्धी जाधव, डॉक्टर रोहित शिंदे, रुचिरा जाधव, विकास सावंत, योगेश जाधव, प्रसाद जवादे, तेजश्री लोणारे या स्पर्धकांसह अनेक स्पर्धक सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

आता या स्पर्धकांमध्ये बिग बॉस कोण होणार यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अशामध्ये सगळ्यांना वेगवेगळे टास्क देखील देण्यात येतात. मात्र, आता बिग बॉसच्या घरामध्ये अतिशय शांत दिसणारा योगेश जाधव हा चांगलाच भडकल्याने चर्चेला एकच उधान आले आहे. नुकताच याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

कलर्स मराठी या वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये योगेशला प्रचंड राग आल्याचे दिसत आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला योगेश थोंड डोकं आहे का तुला? असे मेघा घाडगेला बोलत आहे. यावर मेघा म्हणते, तुझा मेंदू दोन्ही गुडघ्यांमध्ये आहे ते सांभाळ आधी.

या वादामध्ये अपूर्वा नेमळेकर म्हणते, यांचं जेवढं वय नाही ना तेवढं तिचं करिअर आहे. वाद सुरु असताना मेघा चल निघ असे योगेशला म्हणताना दिसत आहे. हा वाद सुरु असताना योगेशला राग अनावर होतो. तो घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जातो. अपूर्वासह काही स्पर्धक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मी तुमच्या बापाचं खातो का?’ असे योगेश म्हणतो.

रागाच्या भरामध्ये खुर्ची उचलतो आणि जोरात जमिनीवर आपटतो. पण या सगळ्या वादामध्ये नेमकी चुकी कोणाची? हे नव्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मराठी बिग बॉस हा शो आपण पाहतात का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral