नाश्त्याला उडदाच्या डाळीची खिचडी खा, मग बघा कमाल !

नाश्त्याला उडदाच्या डाळीची खिचडी खा, मग बघा कमाल !

उडदाची डाळ केवळ चवीलाच चांगली नसते तर तिचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. उडदाची डाळ दोन प्रकारची असते एक पांढरी आणि एक काळी. काळी उडदाची डाळ ही सर्व डाळींमध्ये सर्वाधिक पोषक असते. डाळ भाजी करण्यासोबतच तुम्ही खिचडी तयार करण्यासाठीही वापरु शकता.

उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी थायमीन, रायबोफ्लेविन, नियासीन, व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शिअमसोबत सर्वच आवश्यक पोषक तत्व असतात. या डाळीची खिचडी खाल्याने पचनक्रिया चांगली होते. चला जाणून घेऊन सकाळी नाश्त्याला उडद डाळीची खिचडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….

१) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत – सकाळी नाश्त्यामध्ये उडदाच्या डाळीची खिचडी खाल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. यातून भरपूर प्रमाणात मग्नेशिअम आणि फोलेट मिळतात, याने नसांमध्ये ब्लॉकेज होत नाहीत. मॅग्नेशिअम हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं, कारण याने ब्लड सर्कुलेशन वाढतं.

२) डायबिटीजच्या रुग्णांसाठी बेस्ट – उडीद डाळीतून मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. त्यामुळे ही डाळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. त्यासोबतच याने ब्लडमधील इन्सुलिन आणि ग्लूकोजची लेव्हलही नियंत्रणात ठेवते.

३) प्रोटीनचा भांडार – मांसपेशींच्या विकासात प्रोटीनची महत्त्वाची भूमिका असते. जर तुम्ही शाकाहारी असाल तर उडीद डाळ तुमच्यासाठी प्रोटीन मिळवण्याचं बेस्ट ऑप्शन आहे. प्रोटीन त्वचा, ब्लड, मसल्स आणि हाडांच्या पेशींचा विकास करण्यासाठी महत्त्वाचं आहे.

४) आयर्नची कमतरता भरून निघेल – आयर्नची कमतरता असेल तर उडीद डाळ आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. हे खाल्याने शरीराला ताकद मिळते. मासिक पाळी असताना महिलांनी उडीद डाळ आवर्जून खावी, कारण या दिवसात आयर्नची कमतरता होते.

५) पचनक्रिया राहते चांगली – जर तुम्हाला नेहमीच पोटाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत असेल तर उडदाच्या डाळीची खिचडी खाणे सुरु करा. या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं, याच्या नियमीत सेवनाने पचनक्रिया चांगली होते आणि पोटाच्या समस्या दूर होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral