‘उंच माझा झोका’ मधील चिमुकली झालीय आता इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क!

‘उंच माझा झोका’ मधील चिमुकली झालीय आता इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क!

2011 च्या सुमारास झी मराठी या वाहिनीवर अनेक मालिका या लोकप्रिय झाल्या. त्या याच कालखंडामध्ये झी मराठीला चांगले दिवस होते. मात्र, सध्याच्या झी मराठी वाहिनीच्या मालिका या अतिशय ढिसाळ आणि नियोजन शून्य असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे या मालिकेचा टीआरपी घसरत आहे. 2011 च्या सुमारास ‘उंच माझा झोका’ ही मालिका आली होती. या मालिकेने त्यावेळेस अतिशय लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेने आजच्या मालिकांप्रमाणे रटाळपणा अजिबात लावलेला नव्हता. ऐतिहासिक असणारी ही मालिका काही वर्ष सुरू राहिली. त्यानंतर ही मालिका बंद झाली.

मात्र, या मालिकेची चर्चा अजूनही सुरूच आहे. या मालिकेमध्ये छोट्या रमाबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री एकदम चर्चेत आली आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. 2012 मध्ये त्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका देखील आपल्याला आठवत असेल.

या मालिकेमध्ये घना आणि राधा यांची प्रेम कहानी दाखवण्यात आलेली होती. या मालिकेचे नाव एका लग्नाची दुसरी गोष्ट असे होते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. कालांतराने ही मालिकाही 192 भागातच बंद करण्यात आली. मात्र, या मालिकेला प्रचंड टीआरपी मिळाला होता. उंच माझा झोका ही मालिका देखील प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

या मालिकेत काम करणाऱ्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. मात्र या मालिकेमध्ये छोट्या रमाबाईची भूमिका साकारणारी बालकलाकार आजही अनेकांच्या लक्षात आहे. ही बाल‌कलाकार सध्या काय करते, कशी दिसते याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे.

उंच माझा झोका या मालिकेमध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्री दिसले होते. यामध्ये विशेष करून माधवराव ही भूमिका ही लोकप्रिय ठरली होती. त्याचप्रमाणे या मालिकेमध्ये कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर, मिताली मयेकर यांच्यासह इतरांची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. शरद पोंक्षे यांनी साकारलेली भूमिकाही लोकप्रिय ठरली होती.

रमाबाई रानडे यांची भूमिका अभिनेत्री तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. तेजश्री ही आता खूप मोठी झाली असून तिने देखील अनेक नाटक आणि चित्रपटात देखील आता काम केलेले आहे. भालबा कोळेकर या नाटकांमध्ये तिने काम केलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

त्याचप्रमाणे ‘हो मला जमेल का?’ ‘दहीहंडी’ यासारख्या नाटकात तिने लोकप्रिय असे काम केले आणि या नाटकाचे दिग्दर्शन देखील केले. अशोक सराफ यांच्या सोबतही तिने काम केले. ‘आजी नात’ हे नाटक देखील तिचे खूप लोकप्रिय झाले. आता ती खूप मोठी झाली असून ती आपले फोटो देखील सोशल मीडियावर आणि शेअर करताना दिसत असते‌.

अनेकांना तिला ओळखायला येत नाही. तेजश्री हिच्याकडे आगामी काही काळात आणखी मालिका आणि काही चित्रपट देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Seema