‘अंडरवर्ल्ड डॉन’ सोबत संबंध ठेवून या अभिनेत्रींनी केले होते आपले करिअर खराब, एक तर आहे मराठी कुटुंबातील…

‘अंडरवर्ल्ड डॉन’ सोबत संबंध ठेवून या अभिनेत्रींनी केले होते आपले करिअर खराब, एक तर आहे मराठी कुटुंबातील…

अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडचा खूप जुन्या काळापासून संबंध आहे, परंतु अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे करिअर अंडरवर्ल्ड गुंडाबरोबर राहिल्यामुळे खराब झाले आहे.आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी माहिती देणार आहोत ज्यांचे नाव एकेकाळी अंडरवर्ल्डशी संबंधित होते आणि यामुळे त्यांचे करिअर आणि संपूर्ण आयुष्य अस्ताव्यस्त झाले होते.

वास्तविक, बॉलिवूड हे स्वतः एक वेगळे जग आहे. इथे लोक काम मिळवण्यासाठी दिवस-रात्र काम करतात. काही लोकांना काम देखील मिळते, परंतु काही लोकांना काम मिळणे थांबते तेव्हा हे लोक इतर प्रभावशाली लोकांची मदत घेऊ लागतात जेणेकरून त्यांना काम मिळेल. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रींविषयी माहिती देणार आहोत, त्यांच्यासोबतही असेच काही घडले आहे, म्हणजे त्यांनी सुद्धा या मार्गाचा अवलंब केला असे आपण म्हणू…

1) मोनिका बेदी –

बॉलिवूडमध्ये नव्यानव्याने मोनिका आली होती तेव्हा गँगस्टर अबू सालेम याचे तिच्यावर प्रेम जडले होते. मोनिकाला काम मिळावे म्हणून अबूने अनेक निर्माते व दिग्दर्शकांशी बोलणे केले होते. याचा परिणाम असा झाला की मोनिकाला काम मिळायला लागली. नंतर जेव्हा अबू सलेमने बँकॉकमध्ये तळ ठोकला तेव्हा तेथे मोनिकालाही बोलावण्यात आले. यावेळी बनावट पासपोर्ट प्रकरणात मोनिकाला तुरूंगातही जावे लागले. त्यानंतर अबू सालेमला पोलिसांनी बँकॉकमधून अटक केली. अशाप्रकारे, मोनिकाने अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या प्रकरणात तिचे करिअर खराब केले.

2) अनिता अयूब –

अनिता अयूब बॉलिवूडमध्ये पाकिस्तानातून काम करण्यासाठी आली होती. इकडे आल्यानंतर जेव्हा ती स्ट्रगल करत होती तेव्हा दाऊदची तिच्यावर नजर पडली आणि ति दाऊदला खूपच आवडली होती. जेव्हा अनिताला निर्माता जावेद सिद्दीकीने आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिला तेव्हा त्याला दाऊदने गो-ळ्या घा-लून ठा-र मा-रले. दाऊदच्या कनेक्शनमुळे अनिताला बॉलिवूडमध्ये पुढे कामच मिळालं नाही आणि तिला परत आपल्या देशात जावं लागलं.

3) ममता कुलकर्णी –

ममता कुलकर्णी सर्वांनाच माहित आहे. ममता कुलकर्णी ही तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. अंडरवर्ल्डबरोबरच्या तिच्या संगतीनंतर ममताची कारकीर्दही बिघडली, माघे कोर्टाने ममताचा नवरा अंडरवर्ल्ड गँगस्टर विक्की गोस्वामी याला फरारी घोषित केले आहे आणि त्याच्या नावाचे वॉरंटही काढले आहे.

4) सोना आणि हाजी मस्तान –

दाऊद इब्राहिमच्या आधी हाजी मस्तान हे अंडरवर्ल्डमधील खूप मोठे नाव होते. हाजी मस्तान आणि बॉलिवूड अभिनेत्री सोना यांच्यात अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. सोनाशी लग्न करण्यासाठी आणि तिच्याबरोबर स्थायिक होण्यासाठी, हाजी मस्तान एक अंडरवर्ल्ड डॉन बनतो. ‘वन ओपन अपॉन ए टाईम इन मुंबई’ हा चित्रपटही त्याच्या प्रेमकथेवर तयार झाला आहे.

5) मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम –

‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाने आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मंदाकिनी जगातील सर्वात धोकादायक डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रेमात पडली होती. दाऊद इब्राहिममुळे मंदाकिनी बॉलिवूड इंडस्ट्रीत गेली आणि त्यामुळे तिला बऱ्याच चित्रपटांना काम करण्याची संधी मिळाली. नंतर दोघांचेही लग्न झाले होते.

Team Hou De Viral