ह्या मराठी कलाकारांच्या मुलांची युनिक नावं ऐकलीत का

छोट्या पडद्यावर अनेक कलाकार हे सध्या काम करताना यामध्ये आपल्याला आशुतोष गोखले याच्यासह हर्षदा खानविलकर आणि इतर कलाकार देखील मालिकांत काम करताना दिसत असतात. मात्र या कलाकारांच्या मुलांची खरे नाव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी देखील अनेक जण उत्सुक असतात. मात्र, अनेकांना याबाबत माहिती मिळत नाही. आम्ही आपल्याला याबद्दलच या लेखामध्ये माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..
मीनाक्षी राठोड – मीनाक्षी राठोड आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये देवकीच्या भूमिकेमध्ये दिसली होती. काही महिन्यांपूर्वीच तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिच्या मुलीचे नाव अतिशय वेगळ्या पद्धतीचे असून तिने मुलीच नाव यारा आहे ठेवले आहे.
दिपा परब – दीपा परब हिने तू चाल पुढे या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्तरित्या काम केले आहे. तिने काम केलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. तिच्या मुलाचे नाव प्रिन्स चौधरी असे आहे.
माधवी निमकर – माधवी निमकर ही सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आपल्याला दिसते. या मालिकेमध्ये तिने शालिनी ही भूमिका केली आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. माधवी निमकरच्या मुलाचे नाव रूबेन कुलकर्णी असे आहे.
धनश्री काडगावकर – धनश्री काडगावकर हिने तू चाल पुढे या मालिकेमध्ये शिल्पी हिची अतिशय जबरदस्त भूमिका केली आहे. तिच्या मुलाचे नाव कबीर देशमुख असे आहे.
आरोह वेलनकर – आरोह याने देखील या मालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. त्याच्या मुलाचे नाव अर्जुन वेलनकर असे आहे.
श्रेयस तळपदे – श्रेयस याने माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्तरित्या काम केले आहे. या मालिकेमध्ये त्याने यश ही भूमिका साकारली आहे. त्याच्या मुलीचे नाव आद्या असे आहे.
उर्मिला कोठारे – उर्मिला कोठारे आपल्याला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करताना दिसत आहे. उर्मिला कोठारे हिने आदिनाथ कोठारे याच्यासोबत लग्न केले असून त्याच्या मुलीचे नाव जिजा असे आहे.
उर्मिला निंबाळकर – उर्मिला निंबाळकर हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. उर्मिलांच्या मुलाचे नाव अथांग असे आहे.
मंदार जाधव – मंदार जाधव आपल्याला सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करताना दिसत आहे. मंदार याच्या मुलाचे नाव रिहान आणि रिदान असे आहे.
शिल्पा तुळसकर – शिल्पा तुळसकर सध्या तू तेव्हा तशी या मालिकेत काम करताना दिसत आहे. शिल्पा तुळसकर यांच्या मुलीचे नाव श्याव असे आहे.