रिकाम्या पोटी चुकूनही ‘या’ गोष्टींचं सेवन करु नका, केलं तर तुम्हाला होईल खूप पश्चाताप

भूक लागल्यानंतर बहुतांश जणांचा मेंदू काम करणं बंद होतो. कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. कारण आपलं सगळं लक्ष केवळ भूकेवर असते. पण केवळ भूक लागली आहे म्हणून जे मिळेल ते खाणे टाळा. आपण काय खात आहोत? याकडे लक्ष देणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. कारण काही पौष्टिक पदार्थ देखील रिकाम्या पोटी खाल्ल्यानं फायदा होण्याऐवजी त्यामुळे शरीराचे नुकसान होते. असे नेमके का घडते, याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ही फळे खाऊ नका – रिकाम्या पोटी पेरू खाऊ नका. हिवाळ्यामध्ये तुम्ही रिकाम्या पोटी पेरू खाल्ला तर तुमचे पोट दुखण्याची शक्यता आहे. हेच तुम्ही उन्हाळ्यात रिकाम्या पोटी पेरू खाल्ल्यास तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणजे बदलत्या ऋतुनसार फळांचे सेवन करणं आरोग्यास लाभदायक ठरेल. पेरू खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये. यामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. परिणामी गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या पोटाशी संबंधित त्रास उद्भवू शकतो.
सफरचंद – दिवसभरात एक सफरचंद (Apple Benefits) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण हिवाळ्यात रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास रक्तदाबाची समस्या वाढू शकते. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही सफरचंद खाणार असाल तर या समस्येचा तुम्हाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही रिकाम्या पोटी सफरचंद खाऊ शकता. केवळ पोट आणि छातीमध्ये जळजळ होत असल्यास सफरचंद खाणे टाळा. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
दही – उन्हाळ्यात तसंच हिवाळ्यातही रिकाम्या पोटी कधीही दही खाऊ नये. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोणतीही आंबट गोष्ट सहसा टाळावी. दही खाल्ल्यानंतर झोप येते किंवा रक्तदाब कमी होतो, असा काही जणांचा समज आहे. पण असे काही होत नाही. दही खाल्ल्यानंतर पचन प्रकिया धीम्या गतीनं सुरू असल्यास काही जणांना झोप येते. तसंच रक्तदाब कमी होत असल्याचा त्रास असल्यास आहारामध्ये दह्याचा समावेश करण्याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टोमॅटो – हिवाळ्यामध्ये तुम्ही रिकाम्या पोटी टोमॅटो खाऊ शकता. पण उन्हाळ्यामध्ये सकाळी उठल्यानंतर टोमॅटो खाल्ल्यास पोटात आणि छातीमध्ये जळजळ होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे केस गळतीचा त्रास थांबेल. टोमॅटोचं सूप देखील तुम्ही ट्राय करू शकता. टोमॅटोमधील पोषण तत्त्वांमुळे तुमच्या आरोग्यासह त्वचेलाही भरपूर फायदे मिळतील. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
ऋतुनुसार बदलाव्या खाण्याच्या सवयी – बदलत्या ऋतुनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे शरीरावर वाईट परिणाम होत नाहीत. आपल्या खाण्या पिण्याच्या सवयींवर पचन प्रक्रियासह शरीराच्या अन्य क्रिया अवलंबून असतात.
शरीराच्या सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू राहणं आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कित्येक आजारांना स्वतःपासून दूर ठेवू शकतो. निरोगी राहण्यासाठी रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचं सेवन करत आहोत, याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
फळांव्यतिरिक्त अन्य पर्याय – काही फळे रिकाम्या पोटी (Health Tips) खाऊ नये, असे म्हणतात. पण भूक लागल्यानंतर जर तुमच्याकडे पर्यायच नसेल तर जे फळ तुम्ही खात त्याचे बारीक तुकडे करा आणि एक-एक खास योग्य पद्धतीनं चावून खा. असे खाल्ल्यासच त्यातील पोषण तत्त्वांचा तुमच्या शरीराला पुरवठा होईल आणि पोटाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाहीत.
केळी – उदाहरण द्यायचे झाले तर जर तुम्ही रिकाम्या पोटी केळी खाण्याचा विचार करत असाल तर ते पूर्णपणे चावून खाल्ले जाईल याची काळजी घ्यावी. रिकाम्या केळी खाल्ल्यास गॅस होण्याची किंवा पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. शिवाय पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.