धक्कादायक ! …म्हणून ‘या’ लोकप्रिय प्रसिद्ध अभिनेत्रीने ठोकला कलाविश्वाला रामराम

धक्कादायक ! …म्हणून ‘या’ लोकप्रिय प्रसिद्ध अभिनेत्रीने ठोकला कलाविश्वाला रामराम

सध्याच्या जमान्यामध्ये आरोग्यच्या अनेकांना तक्रारी जाणवत आहेत. यामध्ये मग सेलिब्रिटी देखील मागे नाहीत. अनेक कलाकारांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत असल्याने त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करणे सोडून दिले आहे. दिवस रात्र काहीही असो त्यांना काम करावे लागते.

त्यामुळे त्यांनी या क्षेत्राला रामराम ठोकल्याचे देखील पुढे आले आहे. काही दिवसापूर्वी प्रसिद्ध अभिनेता राहुल रॉय याला देखील ब्रेन स्ट्रोक झाला होता. तो काम करत असताना त्याला ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती ठीक आहे.

मध्यंतरी देखील अनेक कलाकारांना अशाच प्रकारे विविध आजारांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे अनेक कलाकार हे आता मनोरंजन विश्वापासून काही दूर होत असल्याचे देखील दिसत आहेत. आता देखील एका अभिनेत्रीला आरोग्याच्या तक्रारीने ग्रासले होते. त्यामुळे तिने मालिका विश्वाला रामराम ठोकला आहे आणि आता ती आपल्या संसारात रममाण झाली आहे.

या अभिनेत्रीचे नाव उर्मिला निंबाळकर असे आहे. उर्मिला निंबाळकर हिने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अतिशय धक्कादायक माहिती शेअर केली आहे. उर्मिला निंबाळकर हिने सांगितले की, गेल्या काही वर्षापासून मला विविध त्रास जाणवू लागले होते. मालिका विश्वामुळेच हे सगळं काही होत असल्याचे माझ्या लक्षात आले.

15 तास ते 17 तास मला काम करावे लागयचे. यामुळे झोप, अवेळी जेवण याचा परिणाम माझ्या आरोग्यावर होऊ लागला होता. त्यामुळे मी आजारी पडू लागले होते. त्यामुळेच मी नंतर मालिका विश्वामध्ये काम करण्याचे सोडून दिले, असे तिने सांगितले आहे. आता काही ठराविक मालिका आणि चित्रपटात मी काम करणार असल्याचे देखील तिने सांगितले आहे.

एकूणच काय तर आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने आपण मालिका विश्वापासून दूर असल्याचे देखील तिने सांगितले.

Team Hou De Viral