सर्वांना ‘दिवाळीची’ आठवण करून देणारा ‘हा’ मराठी कलाकार आज आपल्यात नाही…

सर्वांना ‘दिवाळीची’ आठवण करून देणारा ‘हा’ मराठी कलाकार आज आपल्यात नाही…

दिवाळी म्हटलं की घरात गोड, धोड, फराळ, फटाके, पाहुण्यांचा राबता आणि घरामध्ये नुसती वर्दळ.. असाच हा काहीसा राबता असतो. दिवाळीची उत्सुकता लहान मुलांपासून वृद्धांना असते. दिवाळी आली की नवीन कपडे, मिष्टांन खाणे आणि इतर गोष्टी होत असतात. त्याचप्रमाणे आप्त नातेवाईकांच्या भेटी देखील दिवाळी दरम्यान होत असतात.

बस, रेल्वे गाड्या या सर्व काही फुल असतात. या दरम्यान अनेक आठवणींना उजाळा देखील मिळतो. दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते ते अभंग स्नान. अभ्यंग स्नान केल्याशिवाय दिवाळी हे पूर्ण होत नाही. अभ्यंग स्नानाला उटणे आणि विशेष करून साबण देखील लागत असतो. दिवाळी म्हटलं की साबणाची जाहिरात आलीच.

दिवाळी म्हटलं की आपल्याला मोती साबण घ्यावाच लागतो, असाच काहीसा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून सामान्यांचा जीवनात असतो. दिवाळीलाच केवळ मोती साबण घ्यायचा, असे देखील समीकरण आहे. आजही काहीजण हे समीकरण पाळतात. मात्र, आता आर्थिक परिस्थिती सुधारल्याने नेहमीच चांगल्या साबण वापरण्याच प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

मात्र, तरी देखील दिवाळीत मोती साबणाला एक विशेष महत्त्व आहे. मोती साबणाची अलीकडेच एक जाहिरात खूपच प्रसिद्ध झाली होती. गेल्या काही वर्षांपासून ही जाहिरात टीव्हीवर मोठ्या प्रमाणात लागत होती. ही जाहिरात करणाऱ्या एका कलाकाराचे गेल्या वर्षीच्या सुमारास निधन झाले. त्या कलाकाराची आठवण आजही सर्वांनाच येते.

काही वर्षांपूर्वी आपण टीव्हीवर “उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली” ही जाहिरात पाहिली असेल. ही जाहिरात देखील अशीच गाजली. प्रत्येक दिवाळीच्या तोंडावर ही जाहिरात आवर्जून लागते आणि या जाहिरातीचे बोल असे आहेत की प्रत्येकाच्या तोंडात ते अंगवळणी पडलेले आहेत.

ही जाहिरात करणारे आलर्म काका म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर. विद्याधर करमरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे वय जवळपास 96 वर्षांचे होते. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात मुंबईच्या राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी मोतीच्या जाहिरातीमधून अफाट लोकप्रियता मिळवली.

मात्र, त्याआधी देखील त्यांनी अनेक चित्रपट व जाहिरातींमध्ये काम केले. त्यांनी काम केलेले कार्तिक कॉलिंग कार्तिक, लंच बॉक्स, गेम विथ अनुपम खेर, दो सास बहु और सेन्सेक्स, एक थी डायन, एक थी विलन यासारखे त्यांचे चित्रपट खूप गाजले. याच बरोबर त्यांनी काम केलेल्या इंडियन आयडल, टोमाटो केचप, लेनिवो कंप्यूटर, एशियन पेंट या सारख्या जाहिराती देखील त्यांच्या प्रचंड गाजल्या.

विद्याधर करमरकर यांचे निधन झाल्याने अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Team Hou De Viral