‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मधल्या कलाकाराने दिली ‘गुडन्यूज’, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली ‘गुडन्यूज’

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मधल्या कलाकाराने दिली ‘गुडन्यूज’, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली ‘गुडन्यूज’

आजकाल मनोरंजन विश्वामध्ये जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री हे कुणाच्या प्रेमात पडले असतील तर पहिल्यांदा ते आपल्या चहात्यांना सोशल मीडियावरून माहिती देत असल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळते.

आता देखील एका अभिनेत्रीने अशीच आपल्या बॉयफ्रेंडबद्दल माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो राज्यातील घराघरात पोहोचला आहे. या शोमध्ये काम करणारे सगळेच कलाकार हे जबरदस्त असे काम करत असतात.

या शोमध्ये प्रसाद ओक हे परीक्षकाच्या भूमिकेत आहेत, तर समीर चौगुले विशाखा सुभेदार यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या शोमध्ये आपल्याला इतर कलाकार देखील दिसलेले होते. अंशुमन विचारे, अरुण कदम यांनी देखील या शोमध्ये अतिशय जबरदस्त असे काम केले होते. सचिन गोस्‍वामी, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात यासारखे कलाकार देखील या शो मध्ये आपल्याला दिसलेले आहेत.

मात्र, गेल्या महिन्याचा सुमारास विशाखा सुभेदार यांनी हा शो सोडला. याचे कारण म्हणजे विशाखा सुभेदार ही अनेक नाटकांची निर्मिती देखील करत आहेत. त्याच प्रमाणे इतर मालिकांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी हा शो सोडल्याचे सांगण्यात येते. विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले हे आपल्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना प्रचंड हसवत होते.

मात्र मध्यंतरी विशाखा सुभेदार हे नेहा असून सोडण्याची सांगण्यात येत होते. आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये काम करणाऱ्या वनिता खरात हिने देखील आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. वनिता हिने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून तिच्या इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा फोटो शेअर केला आहे.

हा फोटो पोस्ट करत तिने दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे जाहीर केले आहे. वनिताच्या बॉयफ्रेंडचं नाव सुमित लोंढे असे आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने वनिताने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुंदर शायरी शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां …….हॅप्पी बर्थडे ‘साथी’ तिने अनेक हॅशटॅगही दिले आहेत.

आता तिच्या या फोटोवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भावी आयुष्यासाठी देखील तुम्ही आनंदात राहा असे म्हटले आहे.

Team Hou De Viral