धक्कादायक ! ह्या मराठमोळ्या अभिनेत्री सोबत घडली ‘संतापजनक’ घटना, झालाय बिनकामाचा मनस्ताप

धक्कादायक ! ह्या मराठमोळ्या अभिनेत्री सोबत घडली ‘संतापजनक’ घटना, झालाय बिनकामाचा मनस्ताप

मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री या अंथरुणाला खिळून आहेत, अशी खोडसाळपणे बातमी दिल्याने एक अभिनेत्री चांगल्या भडकल्याचे समोर आले आहे या अभिनेत्रीचे नाव वर्षा दांदळे असे आहे.

गेल्या वर्षी वर्षा यांचा अपघात झाला होता त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माहिती देखील दिली होती. वर्षा यांनी सांगितले होते की, काही दिवसांपूर्वी माझ्या पायाला दुखापत झाली आहे. आता पाय माझा फारच त्रास देत आहे. त्याचप्रमाणे पाठीच्या मणक्याला देखील त्रास होत आहे.

हा अपघात फार भीषण होता. आता मी सध्या घरी आराम करत आहे. माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सदिच्छा व्यक्त करून प्रार्थना करा, असे त्यांनी आपल्या चाहत्यांना म्हटले आहे. वर्षा यांनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. वर्षा यांनी पाहिले न मी तुला या मालिकेत काम केले.

त्याचबरोबर त्यांनी नांदा सौख्यभरे या मालिकेत वच्छि आत्या ही भूमिका साकारली होती. त्यांनी एकाच या जन्मी जणू ही मालिका देखील केली होती. त्याचबरोबर आनंदी हे जग सारे , यासारख्या मालिकेत काम केले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा दांदळे यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे त्यांनी याची दखल घेतलेली आहे. वर्षा या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षिका देखील होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना वर्षा यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार किशोरी पेडणेकर यांनी नाशिक येथे जाऊन वर्षा दांदळे यांची भेट घेऊन त्यांना आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर वर्षा यांना चांगलेच गहिवरुन आले. त्यांनी याबाबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्यांमध्ये कलाकारांना अतिशय मानाचे आणि सन्मानाचे स्थान आहे. आपण माझी तातडीने दखल घेतली. याबाबत मी आभारी आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

आता एका सोशल मीडियावरील साईटने वर्षा यांच्या आजारपणाची बातमी देऊन त्या अंथरुणाला खिळून असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वर्षा या चांगल्या भडकल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी त्या बातमी देणाऱ्या साइटवर चांगला संताप व्यक्त केला आहे आणि सांगितले आहे की, माझी प्रकृती एकदम ठीक आहे आणि त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे.

ज्यामध्ये त्यांच्यासोबत अशोक सराफ हे दिसत आहेत, तर अशा प्रकारे वर्षा यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Team Hou De Viral