या पद्धतीने बनवा लिंबू शरबत, अन अनेक आजारांवर करा मात

या पद्धतीने बनवा लिंबू शरबत, अन अनेक आजारांवर करा मात

उन्हाळ्याच्या दिवस लागले की आपल्याला तहानही खूप मोठ्या प्रमाणात लागत असते. त्याचप्रमाणे घशाला कोरड देखील मोठ्या प्रमाणात पडत असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबूवर्गीय फळे हे अधिक खाल्ल्यास पाहिजे. यामध्ये संत्रा, मोसंबी, लिंबू यासारखा फळांचा समावेश करावा. यामुळे आपल्याला विटामिन्स तर भेटत असतात. मात्र, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील यामुळे वाढते.

त्यामुळे आपल्याला तहान लागली तर ही समस्या देखील कमी होते. विशेष करून आपण लिंबू पाणी जर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिले तर ते अधिक आरोग्यदायी असते. लिंबू पाणी पिण्याचे अनेक असे फायदे आहेत. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये असेच फायदे सांगणार आहोत. मात्र, लिंबू पाणी हे योग्य पद्धतीने बनवले तर त्याचा फार मोठा उपयोग आपल्याला होऊ शकतो. चला तर मग जाणून घ्या काय आहेत फायदे

1) भूक लागणे : लिंबू पाणी जर आपण पिले आपल्याला भूक ही व्यवस्थित लागत असते. त्यामुळे लिंबूपाण्याचे सेवन आपण बारा महिने केले तरी काही हरकत नाही.

2) अपचन : अनेकांना अपचनाचा त्रास होत असतो. जर आपण लिंबू पाण्याचे सेवन केले तर आपली पचनक्रिया सुरळीत होऊन आपल्याला अपचनाचा त्रास होणार नाही.

3) पोट फुगणे : अनेक लोकांना तेलकट, तुपकट खाणे आणि अपचन झाल्यामुळे पोट फुगण्याची समस्या असते. लिंबू पाणी पिऊन आपण पोट फुग्ण्याच्य समस्येवर देखील मात करू शकता.

4) पित्त : काही जणांना पित्त होण्याचा त्रास हा मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे आपण लिंबूपाण्याचे सेवन करावे. पित्ताचा त्रास आपल्याला कमी होऊ शकतो.

या पद्धतीने करा लिंबू पाणी – विशिष्ट लिंबू पाणी करण्यासाठी आपल्याला अर्धा लिटर पाणी लागणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाच चमचे लिंबाचा रस टाकणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये खडीसाखर आपण टाकायची. खडीसाखर ही थंड असते. यामुळे आपल्याला ऊर्जा भेटत असते. त्यानंतर यामध्ये वेलचीपूड टाकायची आहे. त्यानंतर यामध्ये मिरे पूड टाटाची आहे आणि शेवटी यामध्ये आपल्याला लवंग पूड थोडी टाकायची आहे.

हे मिश्रण सर्व एकत्रितपणे चांगले करून घ्यायचे आहे. त्यानंतर ते थोडावेळ तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण घेऊ शकता. यामुळे आपल्याला वरील समस्येवर निश्चित मात करता येते. या सोबतच आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक तहान देखील लागणार नाही.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral