Virender Sehwag च्या पत्नीचे आणि मुलांचे सुंदर फोटो

सौंदर्याच्या बाबतीत क्रिकेटर्सच्या बायका कुणा बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा काय कमी नाहीत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या पत्नीकडेच बघा. वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती खूप सुंदर आहे. दोघांच्या लग्नाला 16 वर्षे झाली पण प्रेम अजूनही त्यांच्यात कायम आहे. सेहवागची पत्नी कोण आहे आणि त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली त्याबाबत आम्ही तुम्हाला सांगतो.
दोघेही बालपणी भेटले होते – आरती ही दिल्लीचे प्रसिद्ध वकील सूरज सिंह अहलावत यांची मुलगी आहे. आरतीच्या काकूचे लग्न सेहवागच्या कुटुंबात झाले होते तेव्हा हे दोघे लहान होते. नातेवाईक असल्याने आरती आणि सेहवाग अनेकदा एकमेकांना भेटत असत. अशातच दोघांची मैत्री झाली. त्यानंतर सेहवागला आरती आवडू लागली. 2002 मध्ये सेहवागने आरतीला प्रपोज केले होते. दोघेही एकमेकांना 17 वर्षांपासून ओळखत होते. पण रोमान्स करण्यासाठी त्यांना 14 वर्षे लागली.
लग्नासाठी अनेक अडचणी – दोघांना एकत्र येण्यात खूप अडचणी आल्या. सेहवागने सांगितले होते की, त्याच्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न होत नाही. त्यामुळे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. वीरूनेच स्वत:साठी मुलगी शोधून काढल्याचा निषेध त्याचे काही नातेवाईक करत होते. आरतीने एकदा सांगितले की आमचे नाते गंभीर आणि वचनबद्ध आहे आणि वीरू नेहमी आपल्या निर्णयावर ठाम होता. त्यामुळे असुरक्षिततेची भावना कधीच आली नाही.
दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने कुटुंबीयांना त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागले. यानंतर दोघांनी 2004 मध्ये लग्न केले. आज सेहवाग आणि आरती हे दोन मुलांचे पालक आहेत. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत. आरती खूप सुंदर आहे. जर तुम्ही तिच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली तर तुम्हाला तिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील.