‘थ्री इडियट्स’मधील या अभिनेत्यावर कोसळले आर्थिक संकट, चाहत्यांकडे केली मदतीची मागणी

‘थ्री इडियट्स’मधील या अभिनेत्यावर कोसळले आर्थिक संकट, चाहत्यांकडे केली मदतीची मागणी

थ्री इडीयट्स चित्रपट हा अनेकांनी पाहिलाच असेल. या चित्रपटामध्ये एका मराठी कलाकाराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. माञ, आता हा मराठी कलाकार आता अंथरुणाला खिळला असल्याचे कळत आहे. तसेच त्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. याबद्दल आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत.

हा चित्रपट प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते राजकुमार हिराणी यांनी केला होता. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामध्ये आपल्याला आमिर खान, शर्मन जोशी आणि शंकर महादेवन यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्यावेळेस प्रचंड कमाई केली. तसेच सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट म्हणून गौरवला गेला होता.

राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटाचे बजेट केवळ 50 कोटी रुपये होते. असे असले तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल चारशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. या चित्रपटात आमिर खान याच्यासोबतच करीना कपूरची देखील लोकप्रिय भूमिका होती.

आमिर खान आणि करीना कपूर यांच्यातील केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे या चित्रपटातील इतर भूमिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. व्हायरस म्हणून चिडवण्यात येणारी भूमिका प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांनी साकारली होती. तर फुंसुख वांगडू ही भूमिकादेखील प्रचंड लोकप्रिय झाली होती. ही भूमिका आमिर खान याने साकारली होती.

तर ओमी वैद्य याने साकारलेली चतुरची भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय ठरली होती. याबरोबर या चित्रपटात जावेद जाफरी यांची भूमिकाही अतिशय गाजलेली होती. तर मोना सिंह हिने देखील या चित्रपटात काम केले. मोना सिंह हिने करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

तर या चित्रपटात काम करणाऱ्या बोमन इराणी म्हणजेच वीर सहस्रबुद्धे यांच्या असिस्टंटची भूमिका साकारणारा गोविंद हा देखील चर्चेत आला होता. आता गोविंद याच्या बाबतीत एक बातमी समोर आलेली आहे ही अतिशय मन हेलावणारी बातमी आहे.

थ्री इडियट्स या चित्रपटात गोविंद ची भूमिका मराठमोळ्या राजेंद्र पटवर्धन यांनी साकारली होती. राजेंद्र पटवर्धन यांनी या चित्रपटामध्ये गोविंद हे पात्र साकारले होते. ते वीर सहस्रबुद्धे यांचे असिस्टंट असतात. त्यांना आपण दाढी करताना देखील पाहिलेले आहे. राजेंद्र पटवर्धन यांनी अनेक चित्रपट आणि मालिका देखील काम केलेले आहेत.

मात्र वयाच्या सरतेशेवटी आता ते प्रचंड आजारी पडलेले आहेत. एका अनाथाश्रमात ते राहत असल्याचे सांगण्यात येते. ते अविवाहित असल्याने त्यांची देखरेख करण्यासाठी देखील कोणी नाही. त्याच प्रमाणे त्यांचा एक पाय कापावा लागला आहे, असे देखील सांगण्यात येत आहे. दुसरा पाय देखील कापण्याची आता वेळ येत आहे.

एका संस्थेने त्यांच्या मदतीसाठी आता पुढाकार घेतला आहे. पुढाकार घेऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. त्यामुळे आता राजेंद्र पटवर्धन यांच्या मदतीला कोण पुढे येते हे देखील आपल्याला पाहावे लागणार आहेत.

मराठी नाट्य कलाकार संघ’ या फेसबुक ग्रुपवर गेल्या आठवड्यापासून एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात प्रसिद्ध राजेंद्र पटवर्धन हे आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना नेमका काय आजार झाला आहे हे देखील सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पोस्टद्वारे त्यांनी त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची सांगितले आहे.

त्यामुळे त्यांना आता मदतीसाठी हात पुढे करण्याची गरज असल्याचे ते देखील अनेक जण सांगत आहेत हा मॅसेज अनेकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे देखील अनेक कलाकार म्हणत आहेत

Team Hou De Viral