चित्रपटसृष्टी दुःखात ! ह्या दिग्गज अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

चित्रपटसृष्टी दुःखात ! ह्या दिग्गज अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम 78 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोसाठी त्या लोकप्रिय झाल्या होत्या. तबस्सुम यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तबस्सुम यांनी 80,90 चा काळ आपल्या उत्कृष्ट अभिनयाने गाजवला होता. रामायणातील रामाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल यांचे मोठे भाऊ विजय गोविल यांच्याशी तबस्सुम यांचा विवाह झाला होता.

तबस्सुम त्यांच्या टॉक शो आणि लहान मुलांच्या भूमिकेसाठी ओळखली जात होत्या. तबस्सुम यांनी हिरा, हाकिकत, बैजू बावरा ,बाप बेटी, धर्मपुत्र ,सुर संगम फिर वही दिल लाया हु ,अफसाना शादी के बाद, दीदार आधी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1947 साली तबस्सूम यांनी बेबी तबस्सूम नावाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

तबस्सुम यांनी लहानपणीच सिनेसृष्टीत पदार्पण केलं होते. त्या जेव्हा पहिल्यांदा टीव्ही वर आल्या तेव्हा त्या अवघ्या 3 वर्षांच्या होत्या. ‘मेरा सुहाग’ हा सिनेमा 1947 साली रिलीज झाला होते. तबस्सुम यांनी या सिनेमात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तसेच तबस्सुम यांनी ‘दीदार’ सिनेमात नरगिस यांच्या लहाणपणीची भूमिका केली होती.

यामुळे त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान यानंतर त्यांनी अनेक सिनेमे केले. या आधी देखील तबस्सुम यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वतः समोर येऊन याबाबत स्पष्टीकरण दिले होते.

मात्र, आता खरच त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलीवूड मध्ये एकच शोककळा पसरली आहे.

Team Hou De Viral