लतादीदी नंतर मराठी चित्रपट सृष्टीला आणखी एक धक्का ! ‘पिंजरा’ चित्रपटातील या दिग्गज अभिनेत्रीचे निधन

लतादीदी नंतर मराठी चित्रपट सृष्टीला आणखी एक धक्का ! ‘पिंजरा’ चित्रपटातील या दिग्गज अभिनेत्रीचे निधन

भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता देखील एका दिग्गज मराठी अभिनेत्रीचे नुकतेच निधन झाले आहे. ही अभिनेत्री म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुवर्णपान असेच म्हणावे लागेल. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक मराठी चित्रपट गाजवले आहेत.

डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासह इतर अभिनेत्यांसोबत या अभिनेत्रीने काम केलेले आहे. काही दिवसांपूर्वी भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचे देखील निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अवघी मराठी चित्रपटसृष्टी व बॉलीवूड देखील हळहळले. मंगेशकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा देखील पाळण्यात आला होता.

या दुःखामध्ये अनेक शासकीय कार्यालय देखील बंद होते. लता मंगेशकर यांच्या आधी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा देखील निधन झालं. रमेश देव हे देखील मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशा प्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीला खूप मोठे धक्के लागत आहेत.

आतादेखील मराठीतील दिग्गज अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे नुकतेच निधन झाले आहे. व वत्सला देशमुख यांनी जुन्या काळामध्ये आपल्या अभिनयाने अनेकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांचा अभिनय दर्जेदार असा होता. चित्रपट दिग्दर्शक त्यांना चित्रपटात घेण्यासाठी रांगा लावायचे, असे त्यावेळेस सांगण्यात येते.

अनेक चित्रपटातील त्यांचा अभिनय हा दर्जेदार होता. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, असे सांगण्यात येत आहे. वत्सला देशमुख यांना मोठा वारसा देखील लाभलेला आहे. स्वतःच्या अभिनयानं मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांच वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

परेल येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम त्यांच्या या बहीण आणि दिवंगत अभिनेत्री रंजना त्यांच्या त्या आई. पिंजरा, ज्योतिबाचा नवस, अमर भूपाळी, वारणेचा वाघ अशा मराठी सिनेमांमध्ये केलेल्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. वत्सला देशमुख यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक तारा निखळला आहे.

तर तुम्हाला वात्सला देशमुख यांचा कोणता चिञपट आवडतो. वत्सला देशमुख यांना कमेंटमध्ये श्रद्धांजली वाहू शकता.

Team Hou De Viral